शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:42 IST

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून ...

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून लगेच तडकाफडकी देशाचे नावात बदल करून ‘इंडिया’चे भारत करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही नाव बदल्यामुळे सर्व कागदपत्रांसह चलनी नोटा, नाणी बदलावी लागणार आहेत. नोटबंदीच्या त्रासातून आजही जनता सावरली नाही, तोपर्यंत नवीन त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. याला विरोध करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने ‘इंडिया’चे भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना भूमिका विचारली. यावेळी राजू शेट्टी सांगलीत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये. त्याला तांत्रिक अडचण आहे. यासाठी पैसाही प्रचंड लागेल. भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा, नाणी बदलावी लागतील. नोटबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का ? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा आदी उपस्थित होते.‘स्वाभिमानी’ स्वतंत्रच लढणारकेंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. या सरकारला तीव्र विरोध करण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत. सत्ता कुणाचीही असली तरी त्यामध्ये साखर कारखानदारांची लॉबी आहेच. हे कारखानदार शेतकऱ्यांचे कधीच हित पाहणार नाहीत. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबर न जाता राज्यात स्वाभिमानी पक्ष स्वतंत्रच लढणार आहे. मी स्वत: हातकणंगले लोकसभा आणि सांगलीसह अन्य मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

रविकांत तुपकर स्वाभिमानी बरोबरचबुलढाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांनीच संघटनेबरोबर असल्याचा खुलासा केला आहे. तुपकरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. ते संघटनेत लवकरच सक्रीय सहभागी होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार