वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

By संतोष भिसे | Published: March 10, 2024 06:10 PM2024-03-10T18:10:44+5:302024-03-10T18:11:13+5:30

मुलीने खऱ्या अर्थाने साजरा केला महिला दिन

The lamp of race left the beggar on the path of death, the daughter of Maya burst forth and took her own! | वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: वंशाचा दिवा म्हणून मुलग्याचे कोडकौतुक केले, पण बापाच्या म्हातारपणी मुलाने त्याला मरणाच्या वाटेवर बेवारस सोडून दिले. बापाच्या मरणयातनांची माहिती मिळताच लेक धावत आली. बापाला घेऊन गेली.

मिरजेतील एका वृद्धाची ही करुण कहाणी. आजारपणामुळे ते मिरजेतील शासकीय रुग्णालयात बरेच दिवस उपचार घेत होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची जबाबदार घेण्यास कोणीच पुढे येईना. सहा-सात महिन्यांपूर्वी बेवारस म्हणून सांगलीत महापालिका व इन्साफ फाउंडेशनच्या सावली बेघर निवारा केंद्रात दाखल झाले. केंद्राच्या व्यवस्थापनाने त्यांची काळजी घेतली. अन्नपाणी व औषधोपचार दिले. यादरम्यान, त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु होता. ८ मार्चरोजी समाजमाध्यमांतून त्यांच्या मुलीचा संपर्क झाला. ती विधवा होती. बाप बेवारस म्हणून सावली केंद्रात राहत असल्याची माहिती मिळताच, ती धावत आली. वडिलांना जवळ केले. भाऊ वडिलांना सांभाळत नसल्याचे सांगितले. मुलाच्या निष्ठुरपणाची कहाणी ऐकून व्यवस्थापक मुस्तफा मुजावर सुन्न झाले. महिला दिनी मुलीने एका मुलीचे कर्तव्य निभावण्याचा मोठेपणा दाखविला. महिला दिनाचा खराच अर्थ सांगितला.   महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, ज्योती सरवदे यांच्या पुढाकाराने बापाला मुलीच्या रुपाने हक्काचा आश्रय मिळाला. सावली केंद्राचे रफीक मुजावर, रेखा मद्रासी आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The lamp of race left the beggar on the path of death, the daughter of Maya burst forth and took her own!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.