शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

तासगावात ‘मोरया’चा जयघोष अन् भाविकांच्या भक्तिरसात ऐतिहासिक रथोत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 6:40 PM

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, रथोत्सवातील भाविकांची गर्दी आणि उत्साह नजरेचे पारणे फेडणारा ठरला

दत्ता पाटीलतासगाव : ‘मंगलमूर्ती मोरयाऽऽ’च्या जयघाेषात निनादलेली तासगाव नगरी, गुलाल, पेढ्यांची उधळण आणि ढोल-ताशांचे लयबद्ध वादन अशा भक्तिमय वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २४४ वा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. रथोत्सवातील भाविकांची गर्दी आणि उत्साह नजरेचे पारणे फेडणारा ठरला.पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पटवर्धन राजवाड्यातून सर्व मानकऱ्यांसह छबिना बाहेर पडला. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे ‘श्रीं’ची आरती झाली. राष्ट्रगीत झाले आणि एक वाजता रथ ओढण्यासाठी सुरुवात झाली. लाखाे गणेशभक्त ‘माेरयाऽऽ’चा गजर करीत दोरखंड हाती घेऊन रथ ओढत हाेते. गुलाल, पेढे, खोबऱ्यांच्या उधळणीत रथाचा परिसर न्हाऊन निघाला. केळीचे खुंट, नारळाची तोरणे, पताका, फुलांच्या माळा, आदींनी रथ सजविण्यात आला होता. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशिविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात आला. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट झाली. श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेश मंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, रोहित पाटील, पटवर्धन कुटुंबीय आणि मानकऱ्यांसह लाखो गणेशभक्तांनी रथोत्सवात सहभाग घेतला.सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार रवींद्र रांजणे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन केले.

टॅग्स :Sangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळ