शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
4
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
5
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
6
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
7
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
8
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
9
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
10
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
11
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
13
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
14
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
15
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
16
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
17
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
18
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
19
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
20
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:20 IST

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले. ...

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले. शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशू रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.मिरज तालुक्यातील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरात भांडी घासताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याच्या कर्णवेल खरकट्यात पडल्या. हे खरकटे पाणी तेथे असलेल्या गाडवे यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिले. खरकट्यासोबत शेळ्यांनी त्या कर्णवेलही गिळल्या. कर्णवेल गायब झाल्याने तेथे असलेल्या शेळ्यांनी त्या गिळल्याचा गाडवे यांचा अंदाज होता. गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर दोन्ही शेळ्यांच्या पोटात काहीतरी असल्याचे दिसले. यामुळे डॉक्टर ढोके यांनी दोन्ही शेळ्यांची पोटाची शस्त्रक्रिया (रुमीनाटॉमी)करून सुमारे ३० हजार किमतीचे सोन्याचे दोन कर्णवेल बाहेर काढले. चुकून सोन्याचे कर्णवेल गिळणाऱ्या शेळ्यांना मात्र शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.डॉ. ढोके म्हणाले, शेळ्या, गाय, म्हैस, बैल हे प्राणी खाल्ल्यानंतर रवंथ करतात. त्यांच्या पोटाची रचना चार कप्प्याची असते. या प्राण्यांनी सुई, तार, खिळा, मोळा गिळल्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असल्याने अशा टोकदार वस्तू तातडीने बाहेर काढाव्या लागतात. मात्र सोन्याचे दागिने किंवा अन्य न टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात तशाच राहतात. त्याचा त्या प्राण्यालाही काही त्रास होत नाही. मात्र शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल गिळल्याने त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डॉ. ढोके यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीAnimalप्राणीdoctorडॉक्टरGoldसोनं