शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत

अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमने-सामने आले. जयंत पाटील यांनी विरोधी पक्षात असलेल्या जिल्हाध्यक्षांचा आवर्जुन केलेला सत्कार चर्चेचा विषय बनला आहे. जयंत पाटील यांच्या महायुतीत जाण्याच्या चर्चा यापूर्वीच सुरु झाल्या असल्याने हे त्याचे संकेत तर नाहीत ना, असा सवाल उपस्थित होत आहे.विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेवरुन तर्कवितर्क सुरु आहेत. भाजपमध्ये प्रवेशाचा जयंत पाटील यांनी इन्कार करीत या पोकळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चेमुळे त्यांच्या सत्तेतील सहभागाचा विषय राजकीय गोटात चर्चेचा ठरला. जयंत पाटील यांचे विरोधक निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले गेल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.

जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची नुकतीच सातारा येथे भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत आला. आता वाळवा तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात जयंत पाटील व त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची भेट घेतली. त्यांना थांबवून जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. त्यामुळे आगामी काळात बदलणाऱ्या राजकीय समीकरणाचे हे संकेत मानले जात आहेत.

केवळ भाजप जिल्हाध्यक्षांचाच सत्कारवाळवा तालुक्यात निशिकांत पाटील यांनी भाजप आणि आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद भूषविले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार तर उद्धवसेनेचे अध्यक्ष अभिजित पाटील आहेत. हे तिन्ही विरोधी पक्षातील जिल्हाध्यक्ष त्यांच्याच मतदारसंघातील आहेत. जयंत पाटील व या जिल्हाध्यक्षांची अनेकदा खासगी कार्यक्रमात भेटही झाली. मात्र, त्यांनी कोणाचाही सत्कार केला नाही. केवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष महाडिक यांचाच सत्कार केल्याने यावरुन त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्क लढविले जात आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण