शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून पळालेल्या प्रियकराच्या वडिलाचा मारहाणीत मृत्यू, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:49 IST

प्रेयसीच्या आई-वडिलांसह बारा जणांवर गुन्हा, सात अटकेत

मांगले : मांगले ( ता. शिराळा ) येथे प्रेम प्रकरणातून युगुलाने पलायन केल्यानंतर मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाइकांनी विजेच्या खांबाला दोरीने बांधून व आईला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय ५५, रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.दरम्यान, मुलीचे आई-वडील, भाऊ यांच्यासह बारा जणांविरुद्ध शिराळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील व शुभांगी प्रवीण पाटील या तीन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. अन्य पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद मृत दादासाहेब यांची पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनटेक वसाहत येथे दादासाहेब चौगुले यांचे जनांवरांचे शेड आहे. तर त्याच्या जवळच सुरेश पाटील यांचे राहते घर आहे. मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीस बुधवारी पहाटे प्रेमसंबधातून नेले होते. त्यानंतर दादासाहेब चौगुले व त्यांची पत्नी राजश्री नेहमीप्रमाणे हे पहाटे दुचाकीवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी शेडवर गेले होते.दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ‘आमच्या मुलीस तुमच्या मुलाने पळवून नेले आहे, ते कोठे आहेत सांगा, असा जाब विचारला. दादासाहेब यांनी ‘आम्ही आताच आलो आहोत, आम्हाला माहिती नाही’, असे सांगितले त्यावेळी संजय व सुरेश पाटील, अन्य पाच जणांनी त्यांना मारहाण करत विजेच्या खांबाला बांधले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, प्रवीण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (रा. मांगले) यांनी चौगुले दांपत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दादासाहेब यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे.

गावात तणावमारहाणीत दादासाहेब बेशुद्ध पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर नातेवाइकांनी शिराळा पोलिस ठाण्यासमोर जमा होत, जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तीन महिलांसह सात अटकेतचौगुले यांच्या नातेवाइकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुलीचे वडील सुरेश पाटील, चुलते संजय पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाडळकर या चौघांना अटक केली. तर, कविता पाटील, पद्मा पाटील, शुभांगी पाटील यांना उशिरा अटक केली. प्रवीण पाटील, सनीराज पाटील, संग्रामसिंग पाटील, सचिन पाटील, अजय पाटील यांचा शोध सुरू आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारप्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या गणेश व त्याची प्रेयसी शिराळा पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनाही हकीकत ऐकून धक्काच बसला. उत्तरीय तपासणीनंतर चौगुले यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस