कवठेमहांकाळ : तालुक्यातील रांजणी येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला असून, त्यामुळे या दुष्काळी भागाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाची मोठी संधी अधांतरी राहिली आहे.सुमारे १२८ हेक्टर क्षेत्रावर (३७ हेक्टर खासगी व ९१ हेक्टर शासकीय जमीन) हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०१८ मध्ये भूनिवड समितीने स्थळ पाहणी केली होती. त्यानंतर विविध स्तरांवर हालचाली सुरू झाल्या. २०२२ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून, तसेच नवीन पुणे-बंगळुरू महामार्गासोबत हा प्रकल्प सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, आजतागायत प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.या प्रकल्पाचा सर्वांत मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कृषीमाल निर्यात सुलभ होणार, वाहतूक खर्च कमी होणार आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे तसेच या प्रकल्पात सुमारे २५ एकर क्षेत्र रेल्वे सायडिंगसाठी वापरण्याचा प्रस्ताव असल्याने मालवाहतूक अधिक सुलभ होणार आहे.भूसंपादन प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव यामुळे प्रकल्प रखडल्याचे सांगितले जाते. काही बैठका पार पडल्या असून सकारात्मक हालचाली दिसत असल्या तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो तसेच वाहतूक, गोदाम, लॉजिस्टिक आणि संबंधित उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे हा प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.प्रकल्पाच्या घोषणा होतात, पण काम सुरू होत नाही,अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.शासनाने तातडीने अडथळे दूर करून प्रकल्पाला गती दिली नाही, तर विकासाची ही मोठी संधी कायमची हुकण्याची भीती व्यक्त होत आहे.
रांजणी ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळू शकते. मात्र वर्षानुवर्षे प्रकल्प रखडल्याने विकासाची ही संधी हुकत आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन काम सुरू करणे आवश्यक आहे. - दिगंबर कांबळे, शेकाप नेते, शिरढोण
Web Summary : The long-delayed Ranjani dryport project threatens industrial and economic growth in Kavthemahankal. Despite proposals and announcements, progress stalls due to land acquisition and administrative hurdles. Farmers are set to benefit from easier exports and youth from employment, but citizens express frustration over inaction. Expediting the project is crucial.
Web Summary : रांजणी ड्राईपोर्ट परियोजना में देरी से कवठेमहंकाल के औद्योगिक और आर्थिक विकास पर खतरा मंडरा रहा है। प्रस्तावों और घोषणाओं के बावजूद, भूमि अधिग्रहण और प्रशासनिक बाधाओं के कारण प्रगति रुकी हुई है। किसानों को आसान निर्यात और युवाओं को रोजगार से लाभ होगा, लेकिन नागरिक निष्क्रियता से निराश हैं। परियोजना में तेजी लाना महत्वपूर्ण है।