शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मारहाणीतील जखमी तरूणाचा मृत्यू, चौघांवर खुनाचा गुन्हा; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:40 IST

ऊसतोड मजुरांची जनावरे पिकात गेल्याच्या रागातून मारहाण 

विटा : शेतात राहण्यास जागा दिलेल्या ऊसतोड मजुरांची जनावरे पिकात गेल्याच्या रागातून काठीने डोक्यात मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या रवींद्र धोंडीराम नलवडे (वय ३६, रा. पंचलिंगनगर, भाळवणी) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी संशयित प्रवीण मोहन नलवडे (वय ३०), दीपक मोहन नलवडे (वय २९), सागर विलास नलवडे (वय ३१) व छबाबाई मोहन नलवडे (सर्व रा. पंचलिंगनगर, भाळवणी, ता. खानापूर) या चौघांविरुद्ध विटा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर (भाळवणी) येथील रवींद्र नलवडे यांच्या शेतात ऊसतोड मजुरांना राहण्यासाठी जागा दिली आहे. दि. ३१ डिसेंबरला ऊसतोड मजुरांची जनावरे संशयित प्रवीण नलवडे याच्या शेतात शिरली. जनावरांनी पिकांचे नुकसान केल्याचा कारणावरून संशयित प्रवीण, त्याचा भाऊ दीपक मोहन नलवडे, साथीदार सागर नलवडे यांनी रवींद्र यांच्या डोकीत, कपाळावर, हातावर काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र नलवडे यांना सांगलीच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना साेमवारी त्यांचा मृत्यू झाला. मृत रवींद्र यांचे भाचे जितेंद्र पवार (रा. तासगाव) यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रवीण, दीपक, सागर नलवडे याच्यासह छबाबाई नलवडे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील छबाबाई नलवडे ही फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. उपनिरीक्षक सचिन शेंडकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस