शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कालव्यात पडून रात्रभर तडफडत राहिले जीव, तासगावच्या अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:38 IST

अपघातात बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली

दत्ता पाटीलतासगाव : चिमुकल्या राजवीच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे अनेक सुंदर क्षण कवेत घेऊन तासगावचे राजेंद्र पाटील त्यांच्या दोन्ही मुली व नातवंडांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. मनाच्या पटलावर कार्यक्रमातील आनंदाच्या लाटा उधाणलेल्या असतानाच परतीच्या प्रवासात अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच मृत्यूच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला अन् तीन कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाली. वाढदिवसाच्या आनंदाच्या कोंदणात काळाने मृत्यूचे गोंदण काेरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.बांधकाम अभियंता असलेले राजेंद्र पाटील यांच्या लहान मुलीच्या मुलीचा मंगळवारी तिसरा वाढदिवस. यानिमित्ताने सर्व परिवाराने एकत्रित येऊन मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला. आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले. कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून पाटील कुटुंबीय तासगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. मोठी मुलगी पुण्याहून उन्हाळ्याच्या सुटीसाठी आठ दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. तिच्यासह तिच्या दोन्ही मुली सोबतच होत्या. वाढदिवस झाल्यानंतर कोकळे येथे असणारी लहान मुलगी आणि वाढदिवस झालेली नात राजवी यांनाही सोबत घेतले आणि उन्हाळ्याच्या सुटीचे आठ दिवस एकत्रित मुली आणि नातवंडांसमवेत साजरे करण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले.तासाभराचा प्रवास करून मध्यरात्री ते तासगावजवळ आले आणि अवघ्या काही मिनिटांचा प्रवास शिल्लक असतानाच वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार कालव्यात कोसळली. हा अपघात पहाटेपर्यंत कोणाच्याच लक्षात आला नाही. अखंड रात्र रक्ताच्या थारोळ्यात चुराडा झालेली कार पडून होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात लक्षात आल्यानंतर एकच हलकल्लोळ माजला.मृत्यू झालेल्या सहाही जणांचे पार्थिव जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राजेंद्र पाटील यांचा मुलगा आणि मोठा जावई हेदेखील बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर रुग्णालयात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश आणि मन सुन्न करणारे चेहरे पाहायला मिळत होते.काही मिनिटांच्या अंतरावर घर आले असतानाच प्रवासात पाटील कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. या घटनेने तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबीयांच्या नातेवाइकांचा आक्रोशदेखील काळीज पिळवटून टाकणारा होता.

..अन् बाळ पोरका झालाअभियंता असलेल्या राजेंद्र पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. दोन्ही मुलींचेे लग्न झाले, तर मुलगा नुकताच अभियंत्याची पदवी घेऊन पुण्याला करिअरसाठी गेला होता. अपघाताची माहिती मिळताच तो काही तासांत ग्रामीण रुग्णालयात आला. तिथे आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर त्याने मोठा हंबरडा फोडला. आई-वडिलांनी मुलाचे ‘बाळ’ असे टोपण नाव ठेवले होते. या अपघाताने बाळ पोरका झाल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.

रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर आक्रोशरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी कॅनॉलमध्ये पडल्यानंतर गाडीचा चुराडा झाला. गाडीत असलेल्या पोटच्या मुलीसह, आई-वडील, बहीण आणि बहिणीच्या दोन्ही मुलींचा नजरेसमोर मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात अपघातात बचावलेल्या राजेंद्र पाटील यांची धाकटी कन्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली. मात्र, हा आवाज कोणाच्या कानावर पोहोचला नाही. तब्बल सहा तास मरणासन्न वेदना भोगत गाडीतच तब्बल सहा तास काढले.

पतीच्या डोळ्यातून वेदनांच्या धाराराजेंद्र पाटील यांची मोठी मुलगी प्रियांका खराडे पुणे येथे पतीच्या नोकरीच्या ठिकाणी स्थायिक आहे. आठच दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रियांका दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन माहेरी आल्या होत्या. मात्र, काळाने घाला घातल्यामुळे दोन्ही मुलींसह प्रियांकाला जीव गमवावा लागला. पुण्याहून आलेल्या पती अवधूत खराडे यांनी रुग्णालयाच्या आवारातच हंबरडा फोडला होता. अवघे कुटुंबच या अपघातात उद्ध्वस्त झाले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू