शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: हातकणंगले मतदारसंघातील ‘राहू’काळ, भाजपसाठी चिंतेचा; महायुतीत बिघाडी होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:05 IST

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपकडून चाचपणीला वेग

अशोक पाटीलइस्लामपूर : महायुतीच्या जागा वाटपात परंपरेनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जातो. त्यामुळेच विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची तयारी सुरू आहे. दुसरीकडे भाजपमधून राहुल आवाडे आणि राहुल महाडिक यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. हा ‘राहू’काळ भाजप नेत्यांसमोर आता आव्हान बनून उभा आहे. तो लाभदायी ठरणार की त्रासदायी याचा अंदाज अद्याप कोणालाच नाही.राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपकडून चाचपणीला वेग आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे असे मानून विद्यमान खासदार तयारीला लागले आहेत. त्या अगोदरच कोणत्याही परिस्थितीत लोकसभेवर जाणारच, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी करून ऊस उत्पादकांचा लढा हाती घेतला आहे.

२०२४ च्या लोकसभेला महायुतीतून धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची लढत होणार असल्याचे चित्र असतानाच भाजपचे राहुल आवाडे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील महाडिक गटाचे राहुल महाडिक यांनी भाजपकडून खासदारकी लढवण्याचा इशारा देऊन महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.मतदारसंघातील राजकीय पटलावर महायुतीत सध्या दोन ‘राहू’काळ समोर दिसत आहेत. त्यांना दूर करूनच शिवसेनेला जागा द्यावी लागणार आहे. दुसरीकडे महायुतीत सामील असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर विधानसभा आणि लोकसभेसाठी तीन जागा मागितल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत आहेत.

शनिवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष म्हणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि तीन लोकसभा मतदारसंघ आमच्या संघटनेला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. - सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री, रयत क्रांती शेतकरी संघटना 

राज्यातील विविध राजकीय घराण्यांचा अभ्यास केला तर एकाच घरात खासदार, आमदारांची पदे आहेत. त्यांची घराणेशाही चालते. नानासाहेब महाडिक यांच्या घराला काय वावडे आहे? आगामी काळात आम्ही दोघे बंधूही मैदानात उतरण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही. - राहुल महाडिक, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना उमेदवाराचे मेरिट बघावे. या परीक्षेत आपणच आघाडी घेऊ. म्हणूनच भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - राहुल आवाडे, माजी जि.प. सदस्य

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाBJPभाजपाPoliticsराजकारण