Sangli: करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा पूल कोसळला, मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:15 IST2025-07-31T18:15:30+5:302025-07-31T18:15:42+5:30
वारणावती : करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा वारणा डाव्या कालव्यावरील पूल अखेर बुधवारी कोसळला. करुंगली-गुंडगेवाडी, खोतवाडी परिसरातील नागरिक गेल्या कित्येक महिन्यांपासून हा ...

Sangli: करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा पूल कोसळला, मोठी दुर्घटना टळली
वारणावती : करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा वारणा डाव्या कालव्यावरील पूल अखेर बुधवारी कोसळला. करुंगली-गुंडगेवाडी, खोतवाडी परिसरातील नागरिक गेल्या कित्येक महिन्यांपासून हा धोकादायक पूल रहदारीसाठी बंद केला होता.
कालव्याच्या मध्यभागी असलेल्या दगडी पिलरचा काही भाग आधीच तुटून पडला होता आणि उर्वरित पूल कधीही कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; पण प्रशासन ‘बघू पुढे काहीतरी’ या धोरणावरच अडगळीला टाकत होतं. ‘लोकमत’ने या समस्येवर सातत्याने आवाज उठवल्यानंतरच पाटबंधारे विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. बुधवारी दुपारी हा पूल शेवटी कोसळला.
जनतेचा आवाज दुर्लक्षित करू नका, अन्यथा असे धोकादायक पूल रस्ते कोसळतात. आता तरी नव्याने आणि सुरक्षित पूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक म्हणून आम्ही केली आहे. - चंद्रकांत गुंडगे, ग्रामस्थ, गुंडगेवाडी.
कोकरूड पोलिस ठाण्याअंतर्गत करंगुली-गुंडगेवाडी या गावांच्या दरम्यान असलेले वारणा तीर कालव्याचे १२ किलोमीटरच्या गाव पुलाचे दगडी पिलरचे सततच्या आवर्तनामुळे नुकसान होऊन तो ढासळू लागला होता. पाटबंधारे विभागाने कळविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून आम्ही याआगोदरच बंद केला होता. - जयवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, कोकरूड.
करुंगली-गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथील गावपूल वारणा डाव्या कालव्याचा मधला पिलर ढासळून पूल कोसळला आहे. सध्या प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून दोन्ही बाजूंना माती व मुरमाचा ढिगारा टाकून बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करू नये. - आरती बारटक्के, उपकार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे (उत्तर विभाग)