शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईमध्ये प्रसिद्धीसाठी ‘गँगस्टर’ संस्कृतीचे आकर्षण, ‘रील्स’च्या मनोरंजनातून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:29 IST

आग लावली अन् नंतर खुनाचा सीन

सांगली : मध्यवर्ती परिसरातील एका पडीक इमारतीमध्ये विशेषतः शासकीय निवासस्थानांच्या परिसरात उघडपणे खोट्या शस्त्रांचा वापर करून खुनाची रील्स बनवण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित टोळक्यावर कारवाई केली. परंतु हा प्रकार म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे.सध्याच्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी 'गँगस्टर' संस्कृतीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. खोट्या बंदुका आणि हत्यारे घेऊन खुनाचे सीन चित्रित करणे हा प्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. यातून भविष्यातील संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. शहरातील अंधाऱ्या जागांचा वापर अशा कृत्यांसाठी होणे हे सामाजिक आरोग्यासाठी घातक म्हणावे लागेल.

पोलिस अधीक्षकांनी आदेश दिल्यानंतर काहीकाळ कारवाईचा धडाका दिसला. परंतु 'नव्याचे नऊ दिवस' या उक्तीप्रमाणे मोहीम थंड पडली. पोलिसांनी सातत्य न ठेवल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढू शकते. शहरातील बंद आणि पडक्या इमारती आता 'डार्क स्पॉट' बनल्या आहेत. याठिकाणी केवळ रील्स बनविले जात नाहीत, तर नशेखोरी सुरू असते. काही दिवसांपूर्वी बंद इमारतीमध्ये आग लावून नशेखोर पळाले. काँग्रेस कमिटीजवळील इमारतीसारखी मध्यवर्ती ठिकाणे जर असुरक्षित असतील, तर शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो.नशामुक्त अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सक्त आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्याची काटेकोर आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी होण्याची गरज आहे. बैठकांमध्ये होणारे निर्णय आणि प्रत्यक्ष रस्त्यावरील कारवाई यात मोठी तफावत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नशेखोरांचे चांगलेच फावले आहे. केवळ मोहिमेपुरते मर्यादित न राहता, 'बीट मार्शल' आणि पोलिस पथकांनी डार्क स्पॉटवर दररोज अनपेक्षित गस्त घातली पाहिजे.महापालिका आणि पोलिसांनी मिळून अशा पडक्या इमारतींच्या परिसरात हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ज्या खासगी किंवा निमशासकीय इमारती पडीक आहेत, त्यांच्या मालकांना त्या सुरक्षित ठेवण्याच्या किंवा पाडून टाकण्याच्या नोटीस द्याव्यात. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रील्स सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडील सेलने सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. तरच भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल. तसेच कळत-नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले योग्य दिशेने वाटचाल करतील.

बंद इमारती नशेखाेरांचे अड्डेशहरात तसेच उपनगरातील बंद व पडीत इमारती या सध्या नशेखोरांचे आणि रील्स बनवणाऱ्या तरुणांची आवडती ठिकाणे बनली आहेत. या जागांवर कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. अशा इमारतींची यादी बनवून त्या सुरक्षित कराव्यात किंवा तेथे कुंपण घालण्याची गरज आहे.

आग लावली अन् नंतर खुनाचा सीनशहरातील मध्यवर्ती इमारतीमध्ये नशेखोरांनी काही दिवसांपूर्वी आग लावून पलायन केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर याच परिसरात दिवसा ढवळ्या खुनाचा सीन असलेली रील्स बनवली गेली. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gangster Culture Attracts Youth, Reels Fuel Crime in Sangli

Web Summary : Sangli grapples with youth's fascination with gangster culture fueled by social media reels, leading to criminal behavior. Abandoned buildings become hubs for drug use and staged crime scenes. Citizens demand stricter police action, CCTV surveillance, and securing derelict properties to curb rising crime.