शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कराड-कडेगाव-पंढरपूर रेल्वे मार्गाचे स्वप्न भंगले, केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण आले उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:38 IST

कडेगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी संजीवनी ठरणारा कराड - कडेगाव - पंढरपूर (१५४ किमी) हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र ...

कडेगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी संजीवनी ठरणारा कराड - कडेगाव - पंढरपूर (१५४ किमी) हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारने तब्बल सात वर्षांपूर्वीच रद्द केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. २०१४-१५ मध्ये या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही, आर्थिक परतावा दर (-२.२९%) कमी असल्याचे कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकल्पाचा बळी दिला.या निर्णयाची माहिती सात वर्षे जनतेसमोर आली नाही. मात्र, सोनसळ येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा सत्याचा बॉम्ब फुटला आणि विकासाचे खोटे गाजर दाखवणाऱ्या धोरणांचा बुरखा फाडला गेला.२३९६.४९ कोटींच्या या रेल्वे प्रकल्पाला केंद्राने नाकारल्याने सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रगतीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. हा रेल्वे मार्ग झाला असता, तर हजारो नागरिकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची संधी मिळाली असती. व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना मिळून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढला असता. मात्र, केंद्र सरकारने या प्रकल्पाला झुगारल्याने नागरिकांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

लढा अखंडित राहील : ॲड. विश्राम कदमहा प्रकल्प केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर लाखो जनतेच्या आशा-आकांक्षांचा प्रश्न आहे. रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला जाईल. हा प्रकल्प पुनरुज्जीवित झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम अशोकराव कदम यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावर अन्याय का?उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे सतत नव्या रेल्वेगाड्या आणि मार्ग मंजूर होतात, मग महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प का डावलले जातात? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. राजकीय नेत्यांनी आता मौन सोडून हा लढा पुढे न्यायला हवा, अन्यथा जनता त्यांनाही जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरPandharpurपंढरपूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार