शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणाच्या प्रशासनाने जल आयोगाच्या नियमालाच फासला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:22 IST

जल आयोगाच्या धोरणानुसार अलमट्टीसह महाराष्ट्रातील धरणांमध्येसुद्धा दि. ३१ जुलै रोजी ५० टक्केच पाणीसाठा असण्याची गरज

महाराष्ट्राच्या जलसंपदाकडूनही तीच चुक : ३१ जुलैपर्यंत ५० टक्केच धरणे भरण्याची आयोगाची सूचनासांगली : केंद्रीय जल आयोगाने पावसाळ्यात धरणांमध्ये किती पाणीसाठा असावा, याविषयी नियमावली प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत ५० टक्केच धरणे भरण्याची गरज असतांना अलमट्टीत ८३ टक्के, तर कोयना ६९ आणि वारणा धरण ८५ टक्के भरले आहे. यावरून अलमट्टी आणि महाराष्ट्राच्या धरण व्यवस्थापनाने केंद्रीय जल आयोगाच्या नियमांना हरताळ फासलेला दिसत आहे.कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांना महापुराचा धोका निर्माण होतो. महापुरात शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि नद्यांची पाणीपातळी या प्रश्नावर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी जागरूक आहेत. म्हणूनच अलमट्टीसह महाराष्ट्रातील धरण व्यवस्थापनाने धरणातून पाणी सोडण्याबाबत जल आयोगाच्या नियमांना हरताळ फासल्याबद्दल सोशल माध्यमांवर टीकाटिप्पणी होत आहे.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल शासनाकडेही तक्रारी झाल्या आहेत. जल आयोगाच्या धोरणानुसार अलमट्टीसह महाराष्ट्रातील धरणांमध्येसुद्धा दि. ३१ जुलै रोजी ५० टक्केच पाणीसाठा असण्याची गरज आहे. ऑगस्टमध्ये ७७ टक्के आणि १५ सप्टेंबरनंतर १०० टक्के धरणे भरण्याची गरज होती; पण जल आयोगाच्या नियमांकडे दोन्ही राज्यांतील धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. कर्नाटकचे अलमट्टी आणि महाराष्ट्राचे कोयना या दोन्ही धरणांचे व्यवस्थापन करणारे अधिकारी जल आयोगाच्या धरण परिचालन मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. दि. ३१ जुलै रोजी अलमट्टी धरण ८५.६ टक्के भरले असून, १०४.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरण ६९ टक्के भरलेले असून, ७२.८१ टीएमसी आणि वारणा धरण ८५ टक्के भरले असून, २९.१३ टीएमसी पाणीसाठा आहे. वास्तविक ही धरणे ३१ जुलैअखेर ५० टक्केच भरणे अपेक्षित आहे. पण, जल आयोगाच्या सूचनांकडे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले, असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान शास्त्र विभागाने पश्चिम महाराष्ट्रात दि. ३ व ४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार अतिवृष्टी झाली तर धरणातील पाण्याचे जलसंपदा विभाग कसे व्यवस्थापन करणार आहे, असा सवालही कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील धरण व्यवस्थापनाने धरणातून पाणी सोडण्याबाबतचे केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे, तरच भविष्यातील महापूराचा धोका टाळणे शक्य आहे. - प्रभाकर केंगार, सेवानिवृत्त अभियंता.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी