शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election 2026: मतदानासाठी प्रशासन सज्ज, झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:13 IST

१८.१८ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

सांगली : जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १८ लाख १८ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी दोन हजार ३९ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी २४८ झोनल अधिकारी आणि आठ हजार ९७९ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, जिल्ह्यात एकूण दोन हजार ३९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी २४८ झोनल अधिकारी व ८,९७९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या १८ लाख १८ हजार ७४२ इतकी असून, यामध्ये स्त्री, पुरुष व इतर मतदारांचा समावेश आहे.कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसह अधिकारी, कर्मचारी हजर होणार आहेत. मतदान शांततेत होण्यासाठी १० तालुक्यांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या (तालुकानिहाय)आटपाडी – १५२जत – २९२खानापूर – १३०कडेगाव – १४८तासगाव – २०१कवठेमहांकाळ – १३०पलूस – १२९वाळवा – ३६०शिराळा – १७१मिरज – ३२६एकूण : २,०३९

या ठिकाणी होणार मतमोजणीआटपाडी – तहसील कार्यालयजत – शासकीय धान्य गोदामखानापूर – बळवंत कॉलेज, विटाकडेगाव – आयटीआय कडेगावतासगाव – मध्यवर्ती प्रशासकीय इमारतकवठेमहांकाळ – प्रशासकीय इमारतपलूस – दिवाणी न्यायालयाजवळवाळवा – शासकीय धान्य गोदाम, ईश्वरपूरशिराळा – शासकीय आयटीआयमिरज – नवीन शासकीय धान्य गोदाम

निवडणूक लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येक मत अमूल्य आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्याची गरज आहे. मतदान केंद्रावर मूलभूत सुविधांसह चोक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election 2026: Administration Ready for Voting

Web Summary : Sangli prepares for ZP elections with 18.18 lakh voters. 2,039 polling centers will be staffed by 248 zonal officers and 8,979 employees. Voting is on February 7th, with counting on February 9th. Police security is heightened across 10 talukas for peaceful polls.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीVotingमतदान