शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

..म्हणूनच चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवले, सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

By अविनाश कोळी | Updated: June 11, 2024 16:52 IST

'आम्ही सध्या हात जोडून विनंती करीत आहोत. आम्हाला हात सोडायला भाग पाडू नये'

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सांगलीतीलकाँग्रेस नेत्याच्या नातलगाकडे आहे. रेंगाळलेल्या उड्डाणपुलामुळे स्थानिक भाजप आमदारावर रोष यावा म्हणूनच हे काम रेंगाळत ठेवण्याचे षडयंत्र केले गेले, अशी टीका मंगळवारी भाजपचे सरचिटणीस सत्यजित पाटील, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी व अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस आश्रफ वांकर यांनी पत्रकार परिषदेत केली.भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी रेंगाळलेल्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यवंशी म्हणाले की, उड्डाणपुलाचे काम यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, यामागे राजकारण शिजत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. पुलाचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे ते ठेकेदार काँग्रेस नेत्याचे नातेवाईक आहेत. काँग्रेस नेत्याच्या सुचनेप्रमाणेच ठेकेदाराकडून काम रेंगाळत ठेवण्यात आल्याचा आमचा संशय आहे. या गोष्टीतून जनतेचा रोष भाजप आमदारांवर यावा, यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. मुदतीत हे काम पूर्ण करावे, अन्यथा आम्ही ठेकेदाराविरुद्ध आंदोलन सुरु करु. याशिवाय संबंधित नेत्याचे नावही आम्ही जाहीर करु. आम्ही सध्या हात जोडून विनंती करीत आहोत. आम्हाला हात सोडायला भाग पाडू नये, असा इशारा त्यांनी दिला.सत्यजित पाटील म्हणाले की, सहा महिन्यात जे काम अपेक्षित होते ते काम वर्ष झाले तरी अपूर्ण आहे. आणखी सहा महिने तरी हे काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. सांगलीसह विट्यापर्यंतच्या गावातील सर्व नागरिकांचे या पुलाअभावी हाल होत आहेत. पावसाळ्यात आणखी हाल होणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जर काम झाले नाही, तर आम्ही आंदोलन करु. आश्रफ वांकर यांनीही या पुलाच्या रेंगाळण्यामागे राजकारण असल्याचे स्पष्ट करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.

पुलाच्या कामात अकारण काही लोक राजकारण आणत आहेत. कोणत्या गोष्टीमुळे काम लांबले याची माहिती आजवर कधीच या लोकांनी घेतली नाही. रेल्वेचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. जाणीवपूर्वक आम्ही विलंब केला असता तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ते खपवून घेतले असते का? राजकारणासाठी असे वेठीस धरणे चुकीचे आहे. - रोहन पाटील, कंत्राटदार, चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेBJPभाजपाcongressकाँग्रेसagitationआंदोलन