शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

जामदारांची नार्को चाचणी करा

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

विवेक कांबळे : महापालिकेतील अनेक घोटाळे उघडकीस येतील

सांगली : महापालिकेचे गटनेते किशोर जामदार यांची नार्को चाचणी केल्यास अनेक घोटाळे उघडकीस येतील, असा पलटवार महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला. माजी महापौरांच्या काळात केलेल्या ऐनवेळच्या ठरावांचा पर्दाफाश करताना यात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असून, यामागे किशोर जामदारच मास्टरमार्इंड असल्याचा आरोप केला. कांबळे म्हणाले की, महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच्या काळात महासभेत अनेक ऐनवेळचे ठराव झाले आहेत. यात अनेक गैरकारभार झाले आहेत. विश्रामबाग चौकातील एका नाष्टा सेंटरची ९ वर्षाची मुदत संपल्यानंतर २९ वर्षाच्या भाडेपट्टीने जागा दिली आहे. त्यासाठी वर्षाकाठी १४७६० रुपये भाडे आकारले आहे. या मालकाने तिथे लॉन तयार केली आहे. त्याला परवानगी घेतलेली नाही. माजी नगरसेवकाच्या भूखंडाला नुकसानभरपाई देण्याचा विषयही वादग्रस्तच आहे. या ठरावावर किशोर जामदार व संजय मेंढे यांच्या सह्या आहेत. हा ठराव विखंडित करण्याची मागणी केली आहे. जैव भस्मीकरणचा ठेका मेडिकल असोसिएशनला देण्यात आला आहे. या ठेक्यातही पदाधिकाऱ्यांनी आपल्या बगलबच्च्यांची सोय केली आहे. त्याला किशोर जामदार व विजय घाडगे सूचक, अनुमोदनआहेत. याबाबत प्रदूषण मंडळाकडे भस्मीकरण केंद्र ताब्यात घेण्याविषयी पत्र देणार आहोत. मिरज स्मशानभूमी, सिंधी मार्केटच्या भाडेपट्टीचा ठरावही ऐनवेळी घेतला आहे. या सर्व ठरावांमागे किशोर जामदारच आहेत. त्यांची नार्को चाचणी केल्यास अनेक घोटाळे बाहेर पडतील, असा टोलाही त्यांनी लगाविला. महापौर म्हणून आपण चांगले काम करीत असताना नगरसेवकांत गैरसमज पसरवून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. जामदारांच्या कारभाराबाबत अनेक नगरसेवक अनभिज्ञ आहेत. पण ज्या गावच्या बाभळी, त्यागावच्या बोरी याप्रमाणे आपणाला त्यांचा कारभार चांगलाच माहीत आहे. सायंकाळी सहानंतर पालिकेत होणारा रात्रीचा खेळ आपण थांबविला आहे. त्यामुळेच त्यांची ओरड सुरू आहे. ज्या नेत्यांनी मला खुर्चीवर बसविले, त्यांनी एका शब्दानेही विचारलेले नाही. माझा कारभार पारदर्शी असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)