शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 10, 2024 13:49 IST

सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे ...

सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीअकोला येथे भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष लढण्याऐवजी वंचितकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी विशाल पाटील गटाकडून चाचपणी चालू आहे.प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सल्लाही दिला नसल्याचे आंबेडकर म्हणाले.माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.सांगलीच्या जागेसाठी दिल्लीपर्यंत मजल मारूनही ठाकरेंनाच जागा सुटल्याने सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडाचा झेंडा उभारणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. आज सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. त्यानंतर बंडखोरी की वंचितकडून निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय होणार आहे.

बैठकीनंतर निर्णय होणारकाँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पलूसमध्ये बुधवारी सायंकाळी बैठक होत आहे. या बैठकीनंतर विशाल पाटील निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय होणार आहे. अपक्ष की वंचितकडून निवडणूक लढवावी, यावर निर्णय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sangli-pcसांगलीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४vishal patilविशाल पाटीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर