शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: चोरट्यांची दहशत, मध्यरात्री फायरिंग करत एटीएम मशिनच नेले उचलून; सांगली जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 11:13 IST

दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.

कवठेमहांकाळ : मध्यरात्री फायरिंग करत चोरट्यानी शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम वर चोरट्याचा धाडसी दरोडा टाकल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली. आज, शनिवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान हा दरोडा टाकल्याची माहिती आहे.याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शिरढोण गावात चोरट्यांनी भर वस्तीत धाडसी दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी फायरिंग करत एटीएम मशीनच उचलून नेले. दरोडा टाकत असताना  दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.घरमालक निकम यांनी भीतीने दार लावून घेतले. ही गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. तेवढ्यात या चोरट्यानी आपले काम फत्ते करत पलायन केले. या मशीन मध्ये पन्नास लाख मशीन मध्ये असल्याची चर्चा आहे. निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहांकाळ पोलीस यांना रात्रीच दिली.चोरट्यांनी दुसरे मशिनही नेण्याचा प्रयत्न असल्याचे घटनास्थळावरुन दिसून आले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.  घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबल यांनी आज तातडीने भेट दिली. आणि पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले, परंतु ते थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस