कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:33 IST2023-05-17T12:55:32+5:302023-05-17T14:33:38+5:30
या अपघातातील सर्व मृत कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडेचे असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
कोल्हापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ बायपासवर जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाच जण ठार झाले. कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडे चे सर्व मृत आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरोमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरो थेट ट्रॅक्टर मध्ये घुसली.
हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह
मिरजेत रत्नागिरी नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या समोरासमोर धडक होऊन जीपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मिरजेतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसापूर्वीच सुरु झाला असून, या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर येथे आज सकाळी दहा वाजता पंढरपुरच्या दिशेने जाणार्या जीपने विरुद्ध दिशेने आलेल्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
एका जखमी महिलेची प्रकृती गंभीर
या धडकेत जीपमधील चालकासह तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे.मृत पाच जण हे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत. या अपघातात जीपमधील अन्य तीघेजण जखमी झाले असून एका जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे . तिघां जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीसांनी दोन्ही वाहने हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.