शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

आटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 18:24 IST

कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

ठळक मुद्देआटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या१० महिन्यात आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी संकेतस्थळाला भेट

अविनाश बाड

 आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींबद्दल आदराची भावना फारशी दिसत नसताना, कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने कमाल केली आहे. त्यांनी माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत शिक्षक झालेले परशुराम शिंदे मूळचे सोलंकरमळा, मुक्काम हिवरे, पोस्ट धावडवाडी, ता. जत येथील. २०१४ पासून ते कौठुळीत नोकरीस आहेत.

माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्यक्ष शिक्षक, पालक मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण मोबाईलचा केवळ संभाषणापुरताच उपयोग न करता, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठीही मोबाईलचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी शैक्षणिक संकेत स्थळाची निर्मिती केली.www.pdshinde.in असा मजकूर इंटरनेट ब्राऊजरवर सर्च करताच माझी शाळा हे संकेत स्थळ आपल्यासमोर झळकते. तिथे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी शाळेसाठी लागणारे वेळापत्रक, वार्षिक नियोजन अभ्यासक्रम, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे विविध कोरे अर्ज, दाखले, प्रतिज्ञापत्रे, शाळेत वर्षभर राबविण्यासाठी विविध शालेय उपक्रम, परीक्षा, चाचण्या यांचे नमुने सरावासाठी प्रश्नपत्रिका, शालेय पोषण आहार, वार्षिक निकालपत्र, मूल्यमापन नोंदी यांची वापरण्यास अतिशय सोपे व महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पसंतीस उतरलेले आणि शिंदे यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर, साहित्याचा खजिना, महत्त्वाचे शासननिर्णय, शैक्षणिक घडामोडी असे बरेच काही उपलब्ध आहे.विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला विभाग, संस्कारकथा, बोधकथा, गोष्टी, बालगीते, बडबडगीते, थोर पुरुषांची जयंती-पुण्यतिथी, मोबाईल, संगणक वापराची माहिती, उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र, जनरल नॉलेज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जीवन प्रेरणा आवर्जून वाचावेत असे लेख, कवितासंग्रह, नेहमी लागणारी संकेत स्थळे अशी भरगच्च माहिती या संकेत स्थळावर आहे.देश-विदेशातील नेटीझन्सच्या उड्या !परशुराम शिंदे या शिक्षकाने दि. ११ जून २०१७ रोजी निर्माण केलेल्या या संकेत स्थळावर नेटीझन्सनी अक्षरश: उड्या टाकल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह देशातून ७ लाख ११ हजार २१४, अमेरिकेतील ६४ हजार ७९३ जणांनी, तर इंडोनेशियातील ६९१६, जर्मनीतील २२३२, सिंगापूरमधील ९२४, रशियातील ७९४, चीनमधील ७५९, केनियातील ६१७, युनायटेड अरब अमिरातीमधून २५४, तर ब्राझिलमधून १९४ जणांनी भेट दिली आहे.

प्राथमिक शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. गुणवत्ता वाढावी, शिक्षकांना अध्ययन, अध्यापनात मदत होऊन त्यांचा वेळ वाचावा, कारकुन, शिपाई नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लागणारे अर्ज, तक्ते, सर्व साहित्य, माहिती यासाठी विनाखर्च मदत व्हावी आणि गुणवत्तेत वाढ होऊन खासगी शाळांकडे वळू पाहणारे विद्यार्थी, पालक जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळावेत, या एकमेव हेतूने संकेत स्थळाची निर्मिती केली.- परशुराम शिंदेउपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठुळी 

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगलीTeacherशिक्षक