"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:43 PM2021-04-17T18:43:12+5:302021-04-17T18:50:03+5:30

Teacher CoroanVirus Sangli : शिरसगाव तालुका कडेगाव या गावात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यावर  नियंत्रण मिळविण्यासाठी  येथील शिक्षक अरुण शंकर  मांडके यांनी  स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप  पाठीवर घेऊन रुग्ण सापडलेल्या घरामध्ये व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली.हे काम गावातून कोरोना हद्दपार होईपर्यंत अविरतपणे करण्याचा संकल्प अरुण मांडके यांनी केला आहे. 

"Teacher sprays disinfection in Shirasgaon" | "शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"

शिरसगाव तालुका कडेगाव येथील शिक्षक अरुण मांडके यांनी २५ लिटरचा पंप पाठीवर घेऊन गावात औषध फवारणी सुरू केली .यावेळी त्यांना गावातील तरुणांनाही मदत केली. 

googlenewsNext
ठळक मुद्दे"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"गावातील तरुणांचीही साथ :कोरोना हद्दपार होईपर्यंत सेवेचा संकल्प 

कडेगाव  : शिरसगाव तालुका कडेगाव या गावात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यावर  नियंत्रण मिळविण्यासाठी  येथील शिक्षक अरुण शंकर  मांडके यांनी  स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप  पाठीवर घेऊन रुग्ण सापडलेल्या घरामध्ये व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली.हे काम गावातून कोरोना हद्दपार होईपर्यंत अविरतपणे करण्याचा संकल्प अरुण मांडके यांनी केला आहे. 

अरुण मांडके हे भारती विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील विद्यालयात शिक्षक आहेत. शेती आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते गावातून ये जा 
करून नोकरी करतात.मागील वर्षी  त्यांच्यासह कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली होती.अत्यवस्थ स्थितीतून बाहेर येत त्यांनी  कोरोनावर मात केली होती.यामुळे त्यांनी सामाजिक आरोग्यासाठी  गावात  औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून मागील वर्षी प्रमाणे   कंटेन्मेंट झोनची  प्रभावी अंमलबजावणी होत नाही .यामुळे अरुण मांडके यांनी  लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल तेथे २४ तासांच्या आतमध्ये औषध फवारणी करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. 

जोखमीच्या ठिकाणी पीपीई किट परिधान करून ते स्वतः फवारणी करीत आहेत.तर इतर सार्वजनिक ठिकाणी  माजी ग्रा.पं. सदस्य  संदीप निकम , इम्रान मुलाणी,जयेश यादव, राहुल मांडके,रावसाहेब मांडके ,राजेश यादव ,शशिकांत साळुंखे ,माजी सरपंच सतीश मांडके यांचेसह ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना मदत केली.

रुग्णांच्या मदतीसाठीही सदैव तत्पर 

गावातील कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह  रुग्णांना अरुण मांडके  हे योग्य ती दक्षता घेऊन सर्वोतोपरी मदत करीत आहेत.ग्रामस्थांनी 
कोरोना लस घ्यावी यासाठी जागृती करीत आहेत.संचारबंदी ,सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी तरुणांना बरोबर घेऊन योग्य त्या उपाययोजना करीत आहेत.

 

Web Title: "Teacher sprays disinfection in Shirasgaon"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.