शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जविरोधात टास्क फोर्स, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:18 IST

‘लोकमत’च्या मालिकेची गंभीर दखल; बंद कारखान्यांच्या झाडाझडतीचे आदेश

सांगली : अमली पदार्थांचे गोदाम होण्याकडे सांगलीच्या वाटचालीला ब्रेक लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावले उचलली आहेत. ‘लोकमत’मध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या ‘सांगली जिल्ह्याला नशेखोरीचा विळखा’ या मालिकेची गंभीर दखल घेत टास्क फोर्स नियुक्तीचे आदेश त्यांनी दिले. ‘बंद उद्योगांत चाललेय काय?’ या वृत्ताचीही दखल घेत त्यांनी जिल्हाभरातील बंद कारखान्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत.सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीचा अर्धाअधिक वेळ ड्रग्जविषयक चर्चेतच गेला. सर्वच आमदार व खासदारांनी हा विषय उचलून धरला. ड्रग्जसारख्या गुन्हेगारी कृत्याची जिल्ह्याला पार्श्वभूमी नसताना सध्या सापडत असलेल्या साठ्यांमुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याचा आरोप आमदार डाॅ. विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांनी केला. अन्न, औषध प्रशासन आणि पोलिस डोळेझाक करीत असल्याची तक्रार केली.डॉ. कदम म्हणाले, विटा येथे ड्रग्जचा कारखाना नव्याने सुरू झालेला नाही. तो बेकायदेशीरीत्या सुरू राहिला, पण त्याची वेळीच तपासणी झाली नाही. या स्थितीत अन्न व औषध प्रशासन नेमकी कशाची तपासणी करते, असा प्रश्न आहे.आमदार बाबर म्हणाले, विटा येथे अमली पदार्थाचा साठा आढळणे गंभीर आहे. विविध शहरांमध्ये नशेची औषधे राजरोस तयार केली जात आहेत. नशेखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. गोपीचंद पडळकर, अरुण लाड यांनीही कारवाईची मागणी केली.

माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस पालकमंत्री पाटील यांनी यावर ठोस कार्यवाहीची ग्वाही दिली. पत्रकार बैठकीत ते म्हणाले, नशेखोरी रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केले आहे. त्याची बैठक प्रत्येक महिन्याला होईल. कारवाईचा आढावा घेतला जाईल. ड्रग्जची माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस मी वैयक्तिक पातळीवर देणार आहे. विटा येथील साठ्यावर कारवाईसाठी चौघांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस दिले आहे.

पालकमंत्री म्हणाले..

  • बंद कारखान्यांची झाडाझडती घ्या.
  • माहिती देणाऱ्यांना बक्षीस, पोलिसांना सुविधा आणि प्रबोधन हा त्रिस्तरीय कार्यक्रम
  • टास्क फोर्समध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व औषध निरीक्षक
  • शाळांबाहेरील टपऱ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री चालणार नाही.
  • सांगली आणि पुुण्यातील ड्रग्ज गुन्ह्यांविषयी मी गंभीर
टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस