निनाई पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:45+5:302021-08-18T04:31:45+5:30
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील निनाईदेवी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष डाॅ. तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ...

निनाई पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील निनाईदेवी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष डाॅ. तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. तानाजी पाटील म्हणाले, येळापूर येथे असलेली निनाईदेवी पतसंस्थेची शाखा शेडगेवाडीत आल्याने शाखेचे व्यवहार वाढणार आहेत. नवीन ठेवी, सभासद, दैनंदिनी, कर्ज वाटप याकडे लक्ष देण्यात येईल.
यावेळी मावळते अध्यक्ष जयवंत कडोले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीस संस्थेचे संस्थापक ए. डी. पाटील, राष्ट्रवादीची सरचिटणीस सुरेश चिंचोलकर, माजी अध्यक्ष डॉ. बी. एस. आटुगडे, बाजार समिती संचालक दिनकर दिंडे, प्रचिती दूध संघाचे संचालक पैलवान शिवाजी लाड, लक्ष्मण वाघमारे, ज्ञानदेव पाटील, युवा नेते राजू खांडेकर, मधुकर आटुगडे, अरुण पाटील, चंद्रकांत पाटील, सचिव अंकिता वनारे, महादेव बादिवडेकर आदी उपस्थित होते .