कोरोना प्रतिबंधक लस निसंकोचपणे घ्या : शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:57+5:302021-03-05T04:25:57+5:30

शिराळा : संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार ...

Take the corona vaccine without hesitation: Shivajirao Naik | कोरोना प्रतिबंधक लस निसंकोचपणे घ्या : शिवाजीराव नाईक

कोरोना प्रतिबंधक लस निसंकोचपणे घ्या : शिवाजीराव नाईक

शिराळा : संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार असल्याने स्वत:ला या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आरोग्य आणि भारत सरकारने प्रमाणित केलेली कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

ते म्हणाले, शासन प्रमाणित व सर्व परीक्षेत योग्य ठरलेली लस साठ वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता निसंकोचपणे घेणे गरजेचे आहे. आज मी स्वतः माझ्या कुटुंबातील साठ वर्षांच्या पुढील नातेवाईकांना लस घेऊन सुरुवात करत आहे. आपण सर्वांनी पोलिओच्या व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या इतर लसींवर जो विश्वास ठेवला. त्यामुळे अनेक रोग हद्दपार करू शकलो, असाच विश्वास ठेवून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे आणि कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला हद्दपार करावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.

Web Title: Take the corona vaccine without hesitation: Shivajirao Naik