शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

पुन्हा धूमधडाका ---कारण-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 3:38 PM

- श्रीनिवास नागे भाजप-शिवसेना युती शासन पाच वर्षांनी पायउतार झाल्यानंतर स्थापन झालेल्या महाराष्टÑ विकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत ...

ठळक मुद्देनऊ वर्षं त्यांनी राज्याची तिजोरी सांभाळली. ‘सिनियर’ असल्यानं विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. त्याचं फळ मिळालं. राष्टÑवादीकडून पहिल्या क्रमांकानं त्यांनीच शपथ घेतली.

- श्रीनिवास नागेभाजप-शिवसेना युती शासन पाच वर्षांनी पायउतार झाल्यानंतर स्थापन झालेल्या महाराष्टÑ विकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळालीय. शपथविधीच्या पहिल्याच टप्प्यात सांगली जिल्ह्याला स्थान मिळाल्यामुळं जिल्ह्याचा दबदबा कायम राहणार असल्याचं स्पष्ट होतंय. राज्याच्या सत्ताकारणात जयंत पाटील नेहमीच केंद्रस्थानी राहिलेत. आताच्या सत्तानाट्यातही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलीय. ह्यजेजेपीह्ण नव्हे तर ह्यबीजेपीह्ण असा नारा देत त्यांचा हात सोडणारे आयाराम-गयाराम पुन्हा त्यांचे उंबरे झिजवू लागतील, असं चित्र दिसायला लागलंय...

वयाच्या ३८ व्या वर्षी जयंत पाटील यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. संयमी आणि घरंदाज, उच्चशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही, अभ्यासू आणि चाणाक्ष, मुरब्बी आणि हिकमती वगैरे वगैरे विशेषणं त्यांना केव्हाच लागू झाली होती. पवारांनी त्यांना ह्यथिंक टँकह्णमध्ये घेतलं. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या काळात तगडे मंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. आताही भाजपचा ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण करून महाविकास आघाडी सत्तेवर येताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्टÑवादीचा किल्ला निष्ठेनं लढवला. ते राष्टÑवादी कधीही सोडतील, अशी कुजबूज सुरू असताना आणि भलेभले नेते शरद पवारांची साथ सोडून जाताना ते मात्र खंबीरपणे पवारांच्या सोबत राहिले. त्यामुळंच अजित पवारांच्या घरवापसीनंतरही राष्टÑवादीकडून जयंत पाटील यांचंच नाव शपथविधीसाठी पहिल्या क्रमांकानं पुढं आलं.

राष्टÑवादीची स्थापना करण्याआधीच शरद पवारांनी जयंत पाटील यांचे गुण हेरले होते. १९९९ मध्ये आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांच्याकडं अर्थमंत्रालय सोपवलं. वजनदार खातं. नऊ वर्षं त्यांनी राज्याची तिजोरी सांभाळली. ह्यसिनियरह्ण असल्यानं विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. नंतर आर. आर. पाटील यांना ते पद मिळालं. मधल्या जेमतेम नऊ-दहा महिन्यांच्या काळात गृहमंत्रीपद आलं. त्या काळातल्या सांगली-मिरजेतल्या दंगलींवरून त्यांना पक्षातल्या-मित्रपक्षातल्या ह्यहितचिंतकांह्णनी खिंडीत गाठलं. शिंतोडे उडवले. बहुधा त्यामुळंच नंतर त्यांना ग्रामविकास खातं देण्यात आलं. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मोहिते-पाटील आणि भुजबळ हे सिनियर, तर अजितदादा आणि आर. आर. आबा हे दोघे बरोबरीचे. कर्तृत्व आणि वकूब सारखाच. थोडंफार इकडंतिकडं. मात्र त्या चौघांकडं उपमुख्यमंत्रीपद जाताना जयंत पाटील यांना शांत रहावं लागलं.

राज्याच्या राजकारणात ते मुद्दाम ह्यलो प्रोफाईलह्ण राहिले. ते आक्रमक नाहीत, पण थंड डोक्यानं विरोधकांचा ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण करण्यात वाकबगार. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम हे त्यांचे स्पर्धक. पण तिघांचं ह्यअंडरस्टँडिंगह्ण आणि ह्यसेटलमेंटह्ण वाखाणण्यासारखी. आर. आर. आबा जेव्हा राज्याची धुरा सांभाळत होते, तेव्हा जयंत पाटील जिल्ह्यात राष्टÑवादी आणि स्वत:चा गट मजबूत करत होते. भाजपच्या लाटेआधी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, महापालिका, बाजार समिती ही सगळी सत्ताकेंद्रं त्यांच्या ताब्यात होती.

प्रत्येक तालुक्यात गट होता. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप, चन्नाप्पा होर्तीकर, कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे, तासगावात खासदार संजयकाका पाटील, खानापूर-आटपाडीत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पलूस-कडेगावला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड, शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक, मिरजेत नायकवडी घराणं, मनोज शिंदे, सुरेश आवटी, मैनुद्दिन बागवान, सांगलीत माजी आमदार संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की, दिनकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील ते संजय बजाज ही सगळी मंडळी त्यांचं नेतृत्व मानणारी. खुद्द स्वत:च्या इस्लामपूर मतदारसंघातले त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक दिवंगत माजी आमदार, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनीही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं!

...पण हळूहळू पकड ढिली झाली.सत्ताकेंद्रं हातातून सुटू लागली. दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. काहींनी अजित पवारांना जवळ केलं. नंतर तर पक्षच बदलले. बहुतांश मंडळी भाजपमध्ये गेली. मधल्या काळात आर. आर. आबा आणि पतंगराव गेले. सत्ता नसल्यानं जयंत पाटील यांना जुनी पकड जमवता आली नाही. त्यांची स्वत:ची राजकीय महत्त्वाकांक्षा अतिप्रबळ! त्यातूनच त्यांच्याकडून सांगलीच्या वसंतदादा घराण्याच्या खच्चीकरणाचे प्रयत्न झाले. मदन पाटील आणि प्रतीक पाटील त्यात पोळून निघाले.

आधीपासूनच सांगलीच्या भाजपला जयंत पाटील यांच्या तिरक्या चालीमुळंच बळ मिळत असल्याचा आरोप होत होता. त्यांच्या छुप्या रसदीवर भाजपला लोकसभा-विधानसभा निवडणुकांत यश मिळाल्याचीही चर्चा राज्यभर होऊ लागली. सांगलीची भाजप म्हणजे ह्यबीजेपीह्ण नव्हे तर ह्यजेजेपीह्ण (जयंत जनता पार्टी) असल्याची तोफ विरोधक डागू लागले. तिरकी चाल अंगलट येऊ लागली.

भाजप हातपाय पसरू लागली, परिणामी जयंत पाटील यांची मांड सुटू लागली. ज्यांना बळ दिलं, ते पाठ फिरवू लागले. काहीजणांनी तर त्यांच्याशी थेट दुश्मनी घेतली! पंधरा वर्षांच्या सत्तेतून बाहेर पडलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली. जयंत पाटील तर त्याला कसे अपवाद असतील!ते वेळीच सावध झाले. काही सत्ताकेंद्रं पुन्हा ताब्यात घेतली. राज्यभरात दौरे केले. मतदारसंघातलं जाळं आणखी मजबूत केलं. विधानसभेला त्यांना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला. विरोधक विभागले. त्याला जयंत पाटील यांचीच खेळी कारणीभूत ठरली. ते बिनघोर झाले आणि ऐंशी हजाराच्या फरकानं निवडून आले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या भाजपला पहिल्या नंबरवरून खाली खेचून राष्टÑवादीला तिथं बसवलं.शरद पवारांनी भाजपचा ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण केला. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी राष्टÑवादीचा किल्ला निष्ठेनं लढवला. त्याचं फळ मिळालं. राष्टÑवादीकडून पहिल्या क्रमांकानं त्यांनीच शपथ घेतली.

जाता-जाता :जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात दुसºया-तिसºया फळीच्या खांद्यावर हात ठेवला. त्यातल्या काहींचं कोटकल्याण झालं. पण त्यातल्या काहींनी उपकार विसरले. अशांना त्यांनी (त्यांच्याच भाषेत) ह्यनॉन कॉग्निजिबलह्ण (अदखलपात्र) केलं. आता कॅबिनेट मंत्रीपद आलं. त्यांचा हात सोडणारे आयाराम-गयाराम पुन्हा त्यांचे उंबरे झिजवू लागतील. मंत्रीपद गेलं तरी त्यांची ह्यक्रेझह्ण कायम होती. पुढं ती आणखी वाढेल. ते मात्र सरकार किती आणि कसं टिकतंय त्यावर अवलंबून!तिरक्या नजरेनं (आणि गालात हसत) भोवतालची गर्दी न्याहाळत ते चालू लागतील, आणखी ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण करण्यासाठी!

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील