शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:56 IST

खून करून आत्महत्या भासवण्याचा संशय

कवठेमहांकाळ : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील वन विभागाच्या कुरणात एका युवकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गणेश राजू शिवपुजे (वय २२, रा. खिळेगाव, ता. अथणी), असे मयत युवकाचे नाव आहे. घटनास्थळाच्या पाहणीनंतर गणेश याचा खून करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश शिवपुजे याने चार महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीसोबत गावातून पलायन केले होते. गेल्या चार महिन्यांपासून प्रेमीयुगुल बेपत्ता होते. मात्र, गेल्या महिनाभरापूर्वी त्याने आपल्या प्रेयसीला खिळेगाव या आपल्या मूळगावी आणून सोडले होते. त्याची प्रेयसी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अथणी येथील पोलिस ठाण्यामध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल होता. चार महिन्यांपासून अथणी पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा पत्ता लागत नव्हता. मात्र, गुरुवारी सकाळी रांजणी येथील कुरणामध्ये गणेश शिवपुजे याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक ज्योतीराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह लटकावल्याचा पोलिसांचा संशय घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ही घटना संशयास्पद असून, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असला तरी मृतदेहाचे दोन्ही हात हेडफोनच्या वायरने बांधलेले होते. त्याचा शर्ट फाटलेला होता. पायात एक दोरी पडलेली होती, अशी एकूण संशयास्पद परिस्थिती पाहता युवकाचा खून करून मृतदेह लटकावला असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर अधिक तपशील समजू शकणार आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.