शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कानपुरात सोने चोरी करुन पळालेल्या संशयितास इस्लामपुरात घेतले ताब्यात, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:08 IST

इस्लामपूर : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथून सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झालेल्या एका संशयितास कानपूर पोलिसांच्या पथकाने इस्लामपूर बसस्थानकावर ...

इस्लामपूर : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथून सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झालेल्या एका संशयितास कानपूर पोलिसांच्या पथकाने इस्लामपूर बसस्थानकावर जेरबंद केले. त्याच्याकडून सोने-चांदी, टंच काढण्याची मशीन व इतर साहित्य असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.महेश विलास मस्के (रा. नागराळे, ता. पलूस) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचे इतर साथीदार फरार आहेत. बजारिया पोलिस ठाणे हद्दीत महेश मस्के व त्याच्या साथीदारांनी अय्युब युसूफ यांच्या परिवारातील सोने व चांदी विक्री करण्याचे निश्चित केले. १ डिसेंबरला तेथील सराफी व्यापारी संपतराव लवटे यांचेकडून शुद्ध सोने-चांदी काढून त्याची बाजारामध्ये विक्री करून येणारी रक्कम देण्याचे आमिष दाखवत मस्के व त्याच्या टोळीने १५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेतली होती.त्यानंतर या टोळीने अय्युब युसूफ यांना दागिन्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली होती. या टोळीविरुद्ध कानपूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्वजण पसार झाले होते.उत्तर प्रदेश येथील पोलिस उपनिरीक्षक कमलेश पटेल हे आपल्या पथकासह संशयितांचा माग काढत इस्लामपूर येथे आले होते. सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिसांची मदत घेत या पथकाने मस्के हा इस्लामपूर बसस्थानकावर आल्याची माहिती मिळताच तेथे त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.उत्तर प्रदेश पोलिसांनी महेश मस्के याच्याकडून १२ लाखांची १५ किलो १०० ग्रॅम वजनाची चांदीचे लगड, ६ लाख रुपये किमतीचे १६ तोळे वजनाचे सोन्याचे लगड, ३० लाख रुपये किमतीची टंच काढण्याची मशीन, संगणक व इतर साहित्य असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस