सांगलीला अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर, तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:53 IST2025-04-23T18:53:23+5:302025-04-23T18:53:23+5:30
सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी ...

सांगलीला अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर, तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त
सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त राहिली आहेत.
बऱ्याच दिवसांपासून राज्यातील उपजिल्हाधिकारी यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर मंगळवारी राज्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी आंबेजोगाई (जि. बीड) तर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची धाराशिव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.
उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त पुनर्वसन आणि उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे यांची पदोन्नतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. सांगलीतील अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. या रिक्त जागेवर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, पदोन्नतीने गेलेल्या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.
कुणाची कुठे झाली बदली?
- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे : अतिरिक्त जिल्हाधिकारी आंबेजोगाई (जि. बिड)
- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील : अतिरिक्त जिल्हाधिकारी धाराशिव
- प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे : सहआयुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय कोकण.
- उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे : सहआयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे.