सांगली : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्याकडे केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस शब्बीर तांबोळी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गायकवाड यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. विनायक शिंदे म्हणाले, सध्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या तापमानाचा आणि उन्हाच्या झळांचा सर्वाधिक त्रास प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १ मार्च २०२६ पासून सकाळ सत्रात भरविण्याचे आदेश दिले आहेत. माध्यमिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्राथमिकचे विद्यार्थी वयाने लहान असल्याने त्यांना उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे. तरी विद्यार्थी आरोग्य आणि वाढता उन्हाळा लक्षात घेता, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व व खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊन आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच २०२६-२७ वर्षातील वार्षिक सुट्टी पत्रकदेखील अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेले नाही. तेही प्रसिद्ध करावे, अशी मागणी केली आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करून शाळा सकाळ सत्रात भरविण्याबाबत सकारात्मक निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी विनंती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने त्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
Web Summary : Due to intense heat, Sangli's primary teachers' union requests morning school sessions. District Education Officer assures prompt action after a meeting, prioritizing student health amidst rising temperatures and delayed holiday calendar.
Web Summary : गर्मी बढ़ने से सांगली के प्राथमिक शिक्षक संघ ने सुबह की पाली में स्कूल शुरू करने का अनुरोध किया। जिला शिक्षा अधिकारी ने बैठक के बाद तत्काल कार्रवाई का आश्वासन दिया, छात्रों के स्वास्थ्य को प्राथमिकता दी।