देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेचे पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते; पण प्रशासनाने ३५ दिवसांत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.ताकारी योजनेच्या माध्यमातून उन्हाळी व हिवाळी अशी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. या आवर्तनाच्या माध्यमातून रब्बी व वर्षभर असणाऱ्या पिकांना पाणीपुरवठा केला जातो. १४ मार्च रोजी सुरू झालेले पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते. मात्र, हे आवर्तन ३५ दिवस चालवून योजना बंद करण्यात आली आहे. सर्वांना पाणी मिळाले असा अधिकारी दावा करत असले तरी आवर्तन कमी कालावधीत बंद करण्याचे कारण कळले नाही.
कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:59 IST