मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:57 IST2019-05-29T19:55:49+5:302019-05-29T19:57:34+5:30
मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ घडली.

मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्या
सातारा : मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ घडली.
शुभांगी सुदाम सुतार (वय २६, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी ही मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी तिच्या मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणाजवळ फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तेथे विषारी औषध प्राशन केले.
हा प्रकार तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने शुभांगीला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शुभांगी सुतार हिचा घटस्फोट झाला असून, ती माहेरी राहत होती. तिने आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.