शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा हुक तुटला, जीव वाचवायला उडी मारली अन् चाकाखाली सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:33 IST

चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू

शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील तलावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा हुक तुटल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारली असता ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने चालक ठार झाला. आकाश लहू खंडागळे ( वय २०, सद्य रा. आरळा, मुळगाव पुनंदगाव, ता. मादळगाव, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.मयत आकाश, त्याचे वडील लहू खंडागळे, आई उषा, भाऊ सूरज यांचा ऊसतोड व ऊसवाहतूक व्यवसाय आहे. सध्या ते आरळा येथे राहण्यास आहेत. आरळा येथील गणपती भाष्टे यांच्या शेतातील ऊसतोड करून ट्रॅक्टरच्या (क्रमांक एम. एच. २३ बी ६२२८) दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून आकाश कारखान्याकडे निघाला होता.ट्रॅक्टर बिऊर तलावाजवळ आला असता ट्रॉली व ट्रॅक्टरला जोडणारा हुक तुटला. यामुळे जीव वाचविण्यासाठी चालक आकाश याने चालू ट्रॅक्टरमधून उडी मारली. यावेळी आकाश हा उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली आला. चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत लहू श्यामराव खंडागळे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून तपास हवालदार एन. जी. पवार हे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूSugar factoryसाखर कारखाने