शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:46 IST

साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा

कुंडल : दुष्काळी भाग असला तरी स्वाभिमानाने जगण्याची उर्मी येथील माणसांमध्ये आहे. त्यामुळे पाणी नसले तरी व्यवसायांच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे लोक सन्मानाने जगत आहेत. सांगलीच्या कारखानदारीचा देशात लौकिक आहे. येथील साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. डिस्टिलरी, इथेनॉलनंतर आता सीएनजी, हायड्रोजन गॅस निर्मितीकडे वळण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.कुंडल (ता. पलूस) येथे शुक्रवारी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण, जन्मशताब्दी सांगता समारंभ, ‘क्रांतीदर्शी’ या जन्मशताब्दी स्मृती अंकाचे प्रकाशन, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना विस्तारीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.पवार म्हणाले, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्यासह नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर सामान्यांना अभिप्रेत आर्थिक विकास केला. या परिसरातील माणसाला येथेच स्वाभिमानाने जगण्यासाठी पाणी योजना सुरू केल्या. साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालविली. क्रांतिअग्रणी कारखान्याला दरवर्षी पुरस्कार मिळतो, हे अरुण लाड यांच्या काटेकोर नियोजनामुळेच होते.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, जी. डी. बापूंनी सत्तेची पर्वा व सत्तेसाठी राजकारण केले नाही. त्यांचा वारसा अरुण लाड व शरद लाड जपत आहेत. सध्या देशात सत्तेसाठी समाजामध्ये दुही माजविली जात आहे.आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, बापू व पतंगराव कदम यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भविष्यातही दोन्ही कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते कायम राहील.आमदार अरुण लाड म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा बसविल्याशिवाय बापूंच्या स्मारकाचे लोकार्पण करणार नाही, अशी भूमिका होती. त्यामुळे क्रांतिसिंहांच्या पुतळ्याला शासनाचा निधी उपलब्ध झाला.यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आमदार बबनराव शिंदे, सुमनताई पाटील, विक्रमसिंह सावंत, शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, किरण लाड, उदय लाड, दिलीप लाड, प्रतीक पाटील, रोहित पाटील, धनश्री लाड, अविनाश पाटील उपस्थित होते.जयंतरावांचा दोन काकांना टोलाराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात भाजपला टोले लगावताना खासदार पाटील यांना ‘संजयकाका, कानात बोटे घाला,’ असे सांगितले आणि एकच हशा पिकला. वैभव नायकवडी यांना उद्देशून ते म्हणाले, ‘अहो वैभवकाका, नागनाथ अण्णांनी जातीयवादींना कधीही आश्रय दिला नाही,’ यावेळीही खसखस पिकली. 

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार