शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण खून, आरोपीस अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:30 IST

सदानंद औंधे मिरज : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडिया चे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या ...

सदानंद औंधेमिरज : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडिया चे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.सुधाकर खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबीय व सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी रागातून कार्तिक चंदनवाले याने कुऱ्हाडीने अचानक मागून सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला होता. खाडे यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. खुनानंतर कार्तिक चंदनवाले या आरोपीस पोलिसांनी अटक केली. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खाडे यांच्या खुनाच्या घटनेचे मोबाईलवर चित्रण झाले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस