शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:25 IST

पाण्याचा काटकसरीने वापर करा

सांगली : कोयना धरणात सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल नसल्यामुळे गुरुवारपासून कोयना धरणातील विसर्ग शंभर टक्के बंद केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दि. २३ ते २६ जून असे चार दिवस कृष्णा नदीतील शेतीच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे.कोयना धरणात सध्या एकूण १०.८२ टीएमसी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. पाणी वापरासाठी उपयुक्त पाणीसाठा ५.७० टीएमसी असून तो केवळ सहा टक्केच आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो गुरुवारपासून बंद केला आहे. वारणा धरणात १०.७० टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टीएमसी म्हणजे १४ टक्के साठा आहे.कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. त्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २३ ते दि. २६ जूनपर्यंत उपसाबंदी, तर दि. २७ ते दि. ३० जून हा उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. उपसाबंदीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी केले आहे.

काटकसरीने वापर कराकोयना, वारणा धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकरी, औद्योगिक वापरकर्त्यांनी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाने आणि नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदीWaterपाणी