शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:28 IST

सांगलीतील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून राबविला जातोय राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम 

अनिता पाटीलदरीबडची : उन्हाळी सुटीत कुलाळवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर आणि खंडोबा-बिरोबा देवस्थान परिसरातील झाडांची देखभाल, संवर्धन शाळेतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने करीत आहेत.कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व वृक्षप्रेमींच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम राबविला आहे. यातून पर्यावरण रक्षण व भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणे, असा दुहेरी हेतू साध्य झाला आहे.शाळा परिसर, गावठाण, खंडोबा व बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर परिसरावर, घरांच्या सभोवताली, शेतांच्या बांधावर ४२६८ झाडांचे जतन व संवर्धन केले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व श्रमदानातून सुमारे दोन हजार फूट पीव्हीसी व पाच हजार फुटाहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाइपलाइन केली आहे. पालापाचोळा गोळा करून त्याचे मल्चिंग केले आहे. झाडांभोवती तारेचे कुंपण उभारले आहे. अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलियातून मदत पर्यावरणपूरक उपक्रमासाठी अमेरिकेतून सचिन मिरजकर, अभिजित मिरजकर, प्रमोद मंद्रे, सचिन ढमढेरे, संतोष महाजन, आशिष गोर, देवेंद्र सायखेडकर, युथ फॉर जत संस्थेचे अजय पवार (इंग्लंड), प्रमोद मांडरे, आशिष गोर, जोशिल अविक्कल, सिद्धार्थ कुंडलकर, सईद इरफान पाशा, अतुल टेंबे, ऑस्ट्रेलियातून हिमांशू ठाकूर, संजय वाखरे यांनी मदत केली. 

सध्या उन्हाळी सुटी आहे. विद्यार्थ्यांना वृक्षाबद्दल आस्था आहे. त्यामुळे वृक्षसंगोपन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यापूर्वी राबविलेले उपक्रम शाश्वत स्वरूपात टिकवून ठेवण्याचे प्रयत्न आहेत. - भक्तराज गर्जे, शिक्षक

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळाStudentविद्यार्थी