रस्त्याची पंचाईत झाल्याने पंचायत समितीत विद्यार्थी, पालकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:23 IST2021-02-10T16:13:18+5:302021-02-10T16:23:00+5:30
panchayat samiti Sangli- मालगाव (ता. मिरज) येथे मिरज-मालगाव रस्ता ते बरगाले वस्तीकडे जाणारा रस्ता अकारण बंद केल्याने परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समितीत येऊन ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत रस्ता होणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.

रस्त्याची पंचाईत झाल्याने पंचायत समितीत विद्यार्थी, पालकांचा ठिय्या
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे मिरज-मालगाव रस्ता ते बरगाले वस्तीकडे जाणारा रस्ता अकारण बंद केल्याने परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समितीत येऊन ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत रस्ता होणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५६ व ग्रामीण मार्ग ३७४ पूर्ववत खुला करावा, यासाठी येथील ग्रामस्थ गेल्या पंधरा दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. वेगवेगळी कारणे देत हा रस्ता अद्याप त्यांनी सुरु केलेला नाही. त्यामुळे या परिरसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही रस्ता नाही. रस्ता सुरु होत नाही तोपर्यंत पंचायत समितीत ठाण मांडणार असल्याचे पालकांनी सांगितले.
पालक त्यांच्या पाल्यांसह दप्तर घेऊन पंचायत समितीत दाखल झाले. आंदोलनात सिद्धांत जत्ते, आदिती जत्ते, रेणुका जायगोणावर, सन्मती चौगुले, दर्शन चौगुले आदी ४० विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला आहे.