शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Sangli News: बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा बसखाली सापडून मृत्यू, जमावाची एसटीवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:49 IST

याप्रकरणी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिरज : मिरजेतील दत्त चाैकात बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. एसटी बसच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. शाफिन समीर पिरजादे (वय १७, रा. सुभाषनगर, मिरज) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या. याप्रकरणी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शाफिन पिरजादे हा आज, शनिवारी सकाळी १० वाजता आर्षद नरवाडे व सिद्धिक जाफर यांच्यासोबत बारावीची परीक्षा देण्यासाठी मिरज मार्केटकडे चालत निघाला हाेता. दत्त चाैकात गर्दीत पाठीमागून येणाऱ्या (क्र. एमएच ४० वाय ५०६६) या मिरज-डोंगरवाडी एसटीच्या मागील चाकाखाली शाफिन सापडला. चाक अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या शाफिनला तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघातप्रकरणी शहर पोलिसांनी बसचालक ए. एस. खराडे यास ताब्यात घेतले. अपघातानंतर जमावाने पोलिस ठाण्यासमोर बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. शहर पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजAccidentअपघातHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीDeathमृत्यू