शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेटफळेत तरुणांचा दुष्काळ मुक्तीसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:16 IST

लक्ष्मण सरगर । लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी ...

लक्ष्मण सरगर ।लोकमत न्यूज नेटवर्ककरगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी सज्ज झाला आहे. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शेकडो तरुण सरसावले आहेत.राज्यकर्त्यांनी दुष्काळाकडे पाठ फिरवून निवडणुकीचा बाजार भरविला असताना, शेटफळेतील युवकांनी मात्र निवडणुकीच्या रणांगणाऐवजी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावात श्रमदानातून पाण्याचे रणांगण पेटविले आहे. शेटफळे गावातील शेकडो तरुण एकत्र येऊन कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी राबत आहेत. पानी फौंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत शेटफळे गावाने सहभाग नोंदविला आहे. गावामध्ये पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी युवा वर्ग कष्ट घेत आहे. पानी फौंडेशनच्या कार्यक्रमाअंतर्गत गावातील नागरिकांच्यात प्रथम मनसंधारण करून नागरिकांना जलसंधारणाकडे नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम युवा वर्ग राबवित आहे. गावातील प्रत्येक चौक व वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाणीदार झालेल्या गावांच्या चित्रफिती दाखविल्या जात आहेत. अनेक युवक, ज्येष्ठ मंडळी व गावकरी ग्रामस्वच्छतेतून एकत्र येत आहेत.स्मशानभूमीत वृक्षारोपणग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावातील तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण करत सामाजिक संदेश दिला आहे. दुष्काळी परिस्थितीला निसर्गाबरोबरच शासनकर्तेही जबाबदार आहेत. मात्र शासनकर्त्यांवर विसंबून न राहता दुष्काळ मिटविण्यासाठी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराने दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होईल, हे निश्चित. सध्याच्या राजकीय धुळवडीत देशातील युवा वर्ग धुंद असला तरी, शेटफळेतील युवा वर्ग दुष्काळाच्या वणव्यातून बाहेर पडण्यासाठी झगडतो आहे.