शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गणेशोत्सव,मोहरमच्या पार्श्वभूमीवर डॉल्बीचा वापर केल्यास कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:50 AM

कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला.

ठळक मुद्देगणेशोत्सव,मोहरमच्या पार्श्वभूमीवर डॉल्बीचा वापर केल्यास कठोर कारवाईउपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला इशारा

मिरज : कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला.आगामी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर मिरजेत महापालिका सभागृहात शांतता समिती सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि विविध संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपअधीक्षक गील बोलत होते. महापौर संगीता खोत, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, प्रभाग समिती सभापती गायत्री कुल्लोळी आदी उपस्थित होते.उपअधीक्षक गील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाºया डॉल्बी ध्वनियंत्रणेला परवानगी देण्यात येणार नाही. एक बेस-एक टॉपला प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कायद्याच्या कक्षेबाहेर मंडळांनी कोणतीही मागणी करू नये. गणेशमूर्तीची उंची मर्यादित असावी. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी पुढाकार घेऊन गणेश मंडळांच्या मदतीने जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे बांधले. यावर्षीही मंडळांनी अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.या बैठकीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्ते दुरुस्त करावेत, एक खिडकी योजना सुरु करून परवाने द्यावेत, रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी द्यावी, स्वच्छता ठेवावी अशा सूचना केल्या.सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, नगरसेवक निरंजन आवटी, गणेश माळी, पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने, बाबासाहेब आळतेकर, जैलाब शेख, गजेंद्र कुल्लोळी, शकील पिरजादे, अशोक कांबळे, असगर शरिकमसलत, अनिल रसाळ, मुस्तफा बुजरूक, जावेद पटेल, सचिन गाडवे धनराज सातपुते, जयगोंडा कोरे, सचिन चौगुले, तानाजी घार्गे, महावितरण व महापालिका अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSangliसांगली