गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प 

By संतोष भिसे | Updated: December 14, 2023 18:09 IST2023-12-14T18:08:13+5:302023-12-14T18:09:15+5:30

'हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करा'

Stop the road in Jat to protest the attack on MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प 

गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प 

जत : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक केल्याच्या निषेधार्थ जत येथील विजयपूर-गुहागार राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी बांधवांकडून व धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. गुहागर ते विजापूर महामार्गावर ओबीसी व धनगर समाजाने रास्ता रोको केला. ‘एकच छंद गोपीचंद’, ‘भ्याड हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी’, ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सलीम गवंडी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, दिनकर पतंगे, सुनील बागडे, लक्ष्मण जखगोंड, आण्णा भिसे, अनिल पाटील, प्रकाश मोटे, तानाजी कटरे, यशीन मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Stop the road in Jat to protest the attack on MLA Gopichand Padalkar