शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पवित्र पोर्टलची शिक्षक भरती बंद करा, रावसाहेब पाटील यांनी केली शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:00 PM

Pavitra Portal Sangli- महाराष्ट्र राज्य खासगी शाळा अधिनियम व नियमावलीनुसार शिक्षक भरती हा खासगी संस्थांचा कायदेशीर हक्क आहे. त्यावर शासनाने अतिक्रमण करून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू केली होती, ती त्वरित बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शासनाकडे केली.

ठळक मुद्दे पवित्र पोर्टलची शिक्षक भरती बंद करा, रावसाहेब पाटील यांनी केली शासनाकडे मागणी शिक्षण संस्थांचा नोकर भरतीचा अधिकार कायम ठेवा

सांगली : महाराष्ट्र राज्य खासगी शाळा अधिनियम व नियमावलीनुसार शिक्षक भरती हा खासगी संस्थांचा कायदेशीर हक्क आहे. त्यावर शासनाने अतिक्रमण करून पवित्र पोर्टलद्वारेशिक्षक भरती सुरू केली होती, ती त्वरित बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शासनाकडे केली.ते म्हणाले, पवित्र पोर्टल भरती ही सपशेल अपयशी ठरली आहे. विधिमंडळात पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांनी हा मुद्दा उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत पवित्र पोर्टल बंद करून खासगी शिक्षण संस्थांचा नोकर भरतीचा घटनात्मक अधिकार पूर्ववत संस्थांना दिला पाहिजे, अशी जोरदार मागणी केली आहे. या मागणीला राज्यातील खासगी शिक्षण संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे व स्वातंत्र्यानंतरच्या काळात खासगी शिक्षण संस्थांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च आणि उच्च व तंत्र शिक्षणात मोठी गुंतवणूक करून बहुजन समाजातील विविध घटकांचे शिक्षण उत्कृष्टपणे केले आहे. इमारत, क्रीडांगण, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्यसाधने, फर्निचर, क्रीडासाहित्य आदी बाबींवर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जर शिक्षक भरती बाहेरून झाली तर, शिक्षण संस्थांचे शालेय व शैक्षणिक प्रशासन व संघटन विस्कळीत होऊन शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम झाल्याने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी होईल. यासाठी शिक्षक भरती ही संस्थांच्या अधिकारात राहणे सर्वांच्या हिताचे आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व संस्थांचा हा कायदेशीर अधिकार पूर्ववत ठेवावा.राज्यभर आंदोलन छेडणारखासगी शिक्षण संस्थांच्या अधिकारासाठी आमदार अरुण लाड यांनी अधिवशेनात आवाज उठविला आहे. या मागणीसाठी सर्व खासगी शिक्षण संस्था संघटित राज्यभर आंदोलनाचा लढा उभारणार आहे. त्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. शासनाकडून या अधिवशेनात काही तरी निर्णय अपेक्षित आहे. जर निर्णय झाला नाही, तर राज्यभर आंदोलन अटळ आहे, असा इशाराही रावसाहेब पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Pavitra Portalपवित्र पोर्टलSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक