शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:31 IST

बेदाणा उत्पादकांना संकटातून बाहेर काढा

सांगली : चीनमध्ये तयार केला जाणारा बेदाणा नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने, बेकायदेशीपणे भारतात येतो आहे. त्याने भारतीय बेदाण्याचे दर पडले असून त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही चोरटी आयात थांबवा, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी बुधवार संसदेत केले.विशाल पाटील संसदेत बोलताना म्हणाले, यावर्षी बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला चांगल्या दराची अपेक्षा होती. उत्पादन कमी झाले होते, मात्र दर चांगले येणार होते. विशेषतः आता कृष्ण जन्माष्टमी आणि पुढे नवरात्र उत्सवानिमित्त उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाण्याची मागणी असते. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तोवर गेल्या काही दिवसांत चीनचा बेदाणा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आणि एकच गोंधळ माजला. भारतीय बेदाण्याचा उठाव कमी झाला. दर पडले.सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष पीक घेतात. बेदाणा निर्मिती करतात. त्यातून त्यांना थोडे जास्त उत्पन्न मिळते. परंतु, गेल्या काही दिवसांत चीनमध्ये तयार होणारा बेदाणा नेपाळमार्गे भारतात येतो आहे. ही बेकायदेशीर आयात आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बेदाण्याचा दर पडतो आहे. शेतकरी अडचणीत येत आहेत. ते आत्महत्येचा विचार करत आहेत. त्यामुळे तातडीने बेकायदेशीर आयात थांबवायला हवी.

बेदाणा उत्पादकांना संकटातून बाहेर काढाविशाल पाटील म्हणाले, बेदाणा निर्यातीला शासनाकडून अनुदान मिळत होते. परिणामी भारतीय बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी आणि आवक याचे गणित जमत होते. पण, सध्या निर्यातीतील अनुदान बंद आहे. पुन्हा एकदा अनुदान सुरू करण्याची गरज आहे. शेतकरी हिताचे निर्णय गरजेचे आहेत. बेदाणा उत्पादकांच्या हिताचा निर्णय सरकारने करावा आणि त्यांना संकटातून बाहेर काढावे.