मैत्रिणीला फिरविण्यासाठी त्याने चोरल्या चक्क १२ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:42 IST2018-09-20T13:39:59+5:302018-09-20T13:42:46+5:30

मैत्रिणीला घेऊन फिरायला आणि चैनी करण्यासाठी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) साहिल मौला पटेल (वय २१) याने चक्क दुचाकीच्या चोरींची मालिकाच रचल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी उजेडात आली.

To steal the girl, he stole sixteen bikes | मैत्रिणीला फिरविण्यासाठी त्याने चोरल्या चक्क १२ दुचाकी

मैत्रिणीला फिरविण्यासाठी त्याने चोरल्या चक्क १२ दुचाकी

ठळक मुद्देमैत्रिणीला फिरविण्यासाठी त्याने चोरल्या चक्क १२ दुचाकी चोरीची मालिकाच, ढालगावमध्ये छापामहाविद्यालयीन तरुणांना अटक; दुचाकी ताब्यात

सांगली : मैत्रिणीला घेऊन फिरायला आणि चैनी करण्यासाठी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) साहिल मौला पटेल (वय २१) याने चक्क दुचाकीच्या चोरींची मालिकाच रचल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी उजेडात आली. साहिलसह त्याचा मित्र दगडू रामा कुकडे (१९, महमदाबाद, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यास अटक केली आहे. दोघेही महाविद्यालयात पद्विचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडून चोरीतील १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ढालगावमध्ये छापा टाकून ही कारवाई केली.



सांगली शहर व परिसरात गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

ढालगाव येथे साहिल पटेल व दगडू कुकडे हे दोघे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी सापडली. या दुचाकीच्या क्रमांकामध्ये खाडाखोड केली होती. पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र ते उडवाउडवीची उत्तर देऊन लागली.

पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चोरल्याची कबूली दिली. गेल्या आठ महिन्यात त्यांनी सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्याच्याहद्दीतून १२ दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. या दुचाकी त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकल्या होत्या. कागदपत्रे पुन्हा देतो, असे सांगून त्यांनी या दुचाकींची विक्री केली होती.

मैत्रिणीला फिरविण्यासाठी चोरीची मालिका

निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहाय्यक फौजदार राजू कदम, विजय पुजारी, युवराज पाटील, मारुती साळुंखे, विनोद चव्हाण, सुनील चौधरी, सतीश आलदर, जितेंद्र जाधव, अरुण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

साहिलकडून चोरी

साहिल पटेल याची एक मैत्रिण आहे. तिला घेऊन फिरणे व चैनी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग अवलंबून दुचाकी चोरीची मालिका रचल्याचे निष्पन्न झाले आहे. साहिल हॅण्डल लॉक न केलेल्याच दुचाकी चोरीत असे. त्यानंतर दगडू कुकडे याच्या मदतीने तो दुचाकी विकत असे. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून सांगलीतील सात, तर अथणी पोलीस ठाण्याच्याहद्दीतील पाच असे १२ दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title: To steal the girl, he stole sixteen bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.