कुस्ती मल्लविद्या महासंघाचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:16+5:302021-06-26T04:19:16+5:30
कवठेमहांकाळ : राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या फेसबुक पेजवरील माहितीची चोरी करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राज्य ...

कुस्ती मल्लविद्या महासंघाचे निवेदन
कवठेमहांकाळ : राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या फेसबुक पेजवरील माहितीची चोरी करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कवठेमहाकाळ शाखेने केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांना मागणीचे निवेदन दिले.
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या फेसबुकवर पेजवरील माहिती चोरून व त्यात मोडतोड करून ती स्वत:च्या ‘कुस्ती हेच जीवन’ या पेजवर प्रसारित करून महासंघाच्या बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रुपच्या ॲडमिनवर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिथुन वाघमारे, अभिजित शिंदे, हणमंत निकम, प्रकाश पाटील, योगेश वाघमारे, नारायण चंदनशिवे, धनाजी चंदनशिवे, रणजित खुटाळे, गणेश टिंगरे, आरीफ मुलाणी, बसवेश्वर बुरकुल, नाशिर मणेर, आदी उपस्थित होते.