इस्लामपुरात ‘वंचित’तर्फे राज्य व केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:17+5:302021-06-22T04:19:17+5:30
इस्लामपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने डॉ. क्रांती सावंत यांनी महादेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सुमेध माने, महेश कांबळे, ...

इस्लामपुरात ‘वंचित’तर्फे राज्य व केंद्र सरकारचा निषेध
इस्लामपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने डॉ. क्रांती सावंत यांनी महादेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सुमेध माने, महेश कांबळे, निरंज लोखंडे, जितेंद्र पवार, राजू कांबळे, अमित वेटम उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना महामारीच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंची महागाई करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला. महामारीच्या काळातही जनतेच्या अडचणींचा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. क्रांती सावंत यांनी केली.
डॉ. दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथील प्रांताधिकारी कार्यालयात शिरस्तेदार महादेव पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात कोरोनाच्या काळातही सर्वजण महागाईची झळ सोसत आहेत. प्रत्येकाची जीवघेणी अवस्था आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्वस्त किमतीत होणे गरजेचे असताना त्यांचे भाव कडाडले आहेत. महामारीच्या काळात पोषक आहार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याऐवजी कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संचारबंदीचे नियम पाळून उद्योगधंदाही करता येत नाही. या सर्व परिस्थितीला केंद्र व राज्य सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी सुमेध माने, महेश कांबळे, निरंज लोखंडे, जितेंद्र पवार, राजू कांबळे, अमित वेटम, लक्ष्मण डवरी उपस्थित होते.