आजपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पधा
By Admin | Updated: January 29, 2015 00:06 IST2015-01-28T23:27:16+5:302015-01-29T00:06:25+5:30
जयसिंगपुरात आयोजन : अलका कुबल यांची उपस्थिर्ती

आजपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पधा
जयसिंगपूर : येथे राजर्षी शाहू करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेस गुरुवार (दि. २९) पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची तयारी सुरू असून, अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. १ फेब्रुवारी २०१५ अखेर राजर्षी शाहू खुले नाट्यगृहात स्पर्धा होणार आहेत.
स्वप्न-पुणे, अभिव्यक्ती थिएटर (सोलापूर), नाट्यसमूह (सातारा), मुंबई थिएटर्स, महाशाला कला संगम (गोवा), रंगमुद्रा प्रतिष्ठान (अहमदनगर), असे राज्यातील विविध नामवंत कलासंघ यामध्ये सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील नामांकित अशा पुरुषोत्तम करंडकमधील एकांकिकाही या स्पर्धेत सादर होणार आहेत. या स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला असून, सर्व संघ उपस्थित राहणार आहेत. एकूण ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे आणि प्रशस्तिपत्र स्पर्धकांना देण्यात येणार असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट या स्पर्धेचे प्रायोजक असून, देवेंद्र सावंत रंगमंचावर या स्पर्धा पार पाडल्या जाणार आहेत. या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील स्पर्धक, संघाच्या स्वागताकरिता जयसिंगपूर नगरीमध्ये जोरदार तयारी ‘आम्ही रसिक जयसिंगपूर‘ संस्थेच्यावतीने सुरू आहे.
पहिल्या दिवशीच्या एकांकिका
१) स्वप्न - पुणे ‘दि चेंज’ २) नाट्य संस्कृती मिरज ‘पांढऱ्या घोड्यावरील राजपुत्र’ ३) आम्ही कलाकार इचलकरंजी ‘वैकुठांचा मार्ग’ ४) रजनिगंधा कलात्मक प्रवास कोल्हापूर ‘एक तू, एक मी आणि. . ’ ५) रंगकर्मी मिरज ‘गेला श्याम्या कुणीकडे’ ६) बालाजी कॉलेज, इचलकरंजी ‘टेंपल एम्प्लॉयमेंट’. या सर्व एकांकिाक गुरुवारी (दि. २९) सादर होणार आहेत.