आटपाडीच्या होलार समाजमंदीराचे काम सुरु करा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:36 IST2021-03-10T18:34:08+5:302021-03-10T18:36:42+5:30

Religious Places Pwd Sangli- आटपाडी येथील होलार समाज मंदीराचे रखडलेले काम आठ दिवसात सुरु न केल्यास होलार समाज समन्वय समितीतर्फे आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. या बाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता लिला रितेश शहा यांना राजाराम ऐवळे यांच्या हस्ते देण्यात आले.

Start work on Atpadi's Holar Samajmandir, otherwise agitation | आटपाडीच्या होलार समाजमंदीराचे काम सुरु करा, अन्यथा आंदोलन

आटपाडी येथील होलार समाज मंदिर त्वरीत बांधा या मागणीचे निवेदन होलार समाज समन्वय समितीतर्फे उपअभियंता लिला शहा यांना प्रदेशाध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आनंद ऐवळे,प्रभाकर केंगार .दत्ताजी गेंजगे आदी उपस्थित होते. छाया सुरेंद्र दुपटे

ठळक मुद्देआटपाडीच्या होलार समाजमंदीराचे काम सुरु करा, अन्यथा आंदोलनसार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

संजयनगर : आटपाडी येथील होलार समाज मंदीराचे रखडलेले काम आठ दिवसात सुरु न केल्यास होलार समाज समन्वय समितीतर्फे आंदोलन करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. या बाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता लिला रितेश शहा यांना राजाराम ऐवळे यांच्या हस्ते देण्यात आले.

मौजे आटपाडी येथील होलार समाज मंदीराचे काम रखडलेले आहे. ३१ मार्च २०१८ रोजी समाज मंदिरासाठी लोकप्रतिनिधी फंडातून वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याची वर्कऑर्डरही निघाली आहे.सहा महिण्यात काम पूर्ण करायचे असताना २६ महिने उलटून गेले तरी मंदिराचे काम रखडल्याने समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. समाज मंदिराचे काम आठ दिवसाच्या आत सुरु न झाल्यास होलार समाज समन्वय समितीचे प्रदेशध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी युवा प्रदेशअध्यक्ष दत्ताजी गेजगे, जिल्हाध्यक्ष आंनद ऐवळे, अभियंता प्रभाकर केंगार, गणेश भजनावळे, दिपक हेगडे, सिध्दाराम जावीर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Start work on Atpadi's Holar Samajmandir, otherwise agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.