शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा छावण्या सुरू करा, प्रकाश शेंडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: June 1, 2024 16:59 IST

''टँकरला जीपीएस सिस्टम बसवा''

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच दुष्काळग्रस्त जत, आटपाडी तालुक्यांत टँकर सुरू असूनही तिथे पुरेशा खेपा होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. म्हणून सर्व टँकरना प्रशासनाने जीपीएस सिस्टम तातडीने बसवावी, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची प्रकाश शेंडगे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर भेट घेतली. त्यानंतर शेंडगे बोलत होते. ते म्हणाले, जत तालुक्यातील ७३ गावांमध्ये दुष्काळ आहे. या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो नियमाप्रमाणे होत नाही. टँकर कोठे भरला, कोठे खाली केला याची माहिती मिळावी, यासाठी टँकरला जीपीएस सिस्टम बसवावी, अशी मागणी केली.जर मंजूर नियमाप्रमाणे टँकर पुरवले जात नसतील तर तेथील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्याची गरज आहे. मोठ्या जनावरांसह शेळी, मेंढीसाठी विशेष चारा छावण्या मंजूर करण्यात याव्यात. पशुधनाचे चारा नसल्यामुळे मोठे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी धनाजी गडदे, प्रा. कृष्णा आलदर, प्रशांत लेंगरे, अमोल ओलेकर, सुमन माळी, आदी उपस्थित होते.

नुकसान भरपाई द्याजत तालुक्यामध्ये २६ मे रोजी जोराच्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे घरे आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. नुकसानग्रस्तांना जिल्हा नियोजनमधून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळPrakash Shendgeप्रकाश शेंडगेcollectorजिल्हाधिकारी